म्हसावद l प्रतिनिधी
कहाटूळ फाट्या जवळील दर्शन हॉटेलमध्ये सात फुटी अजगर आढळला असून सर्पमित्रांनी त्याला जीवदान दिले.


शहादा शिरपूर रस्त्यालगत असलेल्या कहाटूळ फाट्या जवळील दर्शन हॉटेलमध्ये दि.३ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास हॉटेल मालक बाळा आहिरे यांना बिनविषारी अजगर सर्प दिसून आल्याने त्यांनी तात्काळ शहादा येथील सर्पमित्रांना भ्रमण ध्वनी वरून संपर्क केला व सर्प आढळून आल्याची माहिती दिली सर्प मित्रांनी वेळ न गमावता तात्काळ हॉटेल दर्शन ढाबा कहाटूळ फाटा शिरपूर रॉड गाठले व त्यास सितापीने सुरक्षित पकडले हा सर्प अजगर जातीचा असून त्याची लांबी ही सहा ते सात फूट असून रंग तपकिरी पांढरा आहे व त्याचे वजन नऊ ते दहा किलो आहे.सदर अजगरास सुरक्षीत नेत उनपदेवच्या रानात सोडण्यात आले असल्याचे सर्प मित्रांनी सांगितले या वेळी सर्पमित्र बुद्धभूषण गवळे,जयेश बागले, दिनेश निकुंभे, प्रवीण महिरे यांच्यासह सर्व जीवरक्षक संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते.









