तळोदा l प्रतिनिधी
येथील कला वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय तळोदा येथे महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्ताने युवती सभेचे तसेच आदिवासी साहित्य प्रदर्शनाने उद्घाटन प्राचार्य डॉ.एस.आर.मगरे यांच्या हस्ते झाले. या वेळी कबचौउम जळगाव विद्यापीठ अधिसभा सदस्य डॉ.एस.आर.गोसावी उपस्थित होते. या प्रसंगी आदिवासींच्या जीवनात उपयोगी विविध साहित्य ठेवण्यात आले.या प्रदर्शनात ४०विद्यार्थिं सहभागी झाले. संस्थेचे अध्यक्ष भरत माळी यांचे मार्गदर्शन लाभले. युवती सभेच्या सचिव डॉ. सुनीता गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.समारोप प्रसंगी प्रा.जे.एन.शिंदे यांनी आदिवासी पंरपरा जोपासली गेली पाहीजे असे सांगितले.सुत्रसंचालन डॉ.पराग तट्टे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा.पंकज सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.एस.एन.शर्मा, डॉ.एस.बी.गरुड.,प्रा.आर.डी.मोरे, डॉ.पी.आर.बोबडे, प्रा.ललित पाटील व इतर प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.










