नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार येथे जागतिक अपंग दिनानिमित्त तहसील कार्यालयात दिव्यांग मेळावा आयोजित करण्यात आला होता.
जागतिक अपंग दिनानिमित्त नंदूरबार येथील तहसील कार्यालयात दिव्यांग मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात, पोलिस निरीक्षक किरणकुमार खेळकर, नायब तहसीलदार रमेश वळवी, नायब तहसीलदार नितीन पाटील, नायब तहसीलदार श्री. गावित आदी उपस्थित होते. या मेळाव्यात लाभार्थ्यांना तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी विविध शासकीय योजनांची माहिती दिली. तसेच दिव्यांना साठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.


जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस फिल्ड वर्क विद्यार्थी , मुंबई व ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान संचलित स्वाधार दिव्यांग कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र , नंदुरबार यांनी Celebration of Inclusion ‘ हा कार्यक्रम आयोजित केला होता . या कार्यक्रमात जिल्ह्यातील दिव्यांगासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार , नंदुरबार जिल्ह्यातील दिव्यांगाचे प्रश्न आणि स्थिती यावर सादरीकरण करण्यात आले. तसेच स्वाधार मधील विद्यार्थ्यांचे मसाज प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.









