Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

team by team
December 3, 2021
in कृषी
0

नंदुरबार l प्रतिनिधी
पशुसंवर्धन विभागामार्फत सन 2021-2022 या वर्षांसाठी राज्यस्तरीय नावीण्यपूर्ण योजना व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी पात्र पशुपालक, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती व महिलांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

नावीण्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गायी, म्हशीचे गट वाटप करणे, शेळी, मेंढी गट वाटप करणे, 1000 मांसल पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीसाठी अर्थसाहाय्य देणे, 100 कुक्कुट पिलांचे वाटप करणे तसेच 25+ 3 तलंगा गट वाटपासाठी लाभार्थ्यांची निवड ऑनलाईन पध्दतीने करण्यात येईल.

लाभार्थ्यांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालनापैकी ज्या योजनेसाठी अर्ज करावयाचा आहे ती निवड करण्याची सुविधा, अर्ज व योजनांची संपूर्ण माहिती https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर तसेच अँड्रॉईड मोबाईलवर AH-MAHABMS गुगल प्ले स्टोअरवर 4 ते 18 डिसेंबर 2021 या कालावधीत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या योजनेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येतील. अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कुठल्याही परिस्थितीत अर्जदाराने आपला मोबाईल क्रमांकात बदल करू नये.

योजनेबाबत अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक 1962 किंवा 1800-233-0418 किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार ), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबारचे प्रोफेसर डॉ. दिनेश देवरे यांची विक्रमी झेप, 360 बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’वर कोरले नाव

Next Post

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त गुणवंत कर्मचाऱ्याचा सत्कार

Next Post
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त गुणवंत कर्मचाऱ्याचा सत्कार

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त गुणवंत कर्मचाऱ्याचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add