धडगाव l प्रतिनिधी
तालुक्यातील निगदी ते गोरंबा या रस्त्याची प्रचंड अशी दुरवस्था झाली असून, या रस्त्यावरून वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वाहन धारकांनी थेट साहेब आमच्या रस्त्याची दुरुस्ती होईल का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.
निगदी ते गोरंबा दरम्यान, अकरा किलोमीटर अंतर या रस्त्याची अतिशय प्रचंड अशी दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहन धारकांना मोठी कसरत करावी लागत असल्याने साहेब आमच्या रस्त्याची दुरस्थी होईल का ? या रस्त्याची दुरवस्था होऊन आठ वर्षे झाले, आता खड्डे आमच्या जीवावर उठले आहे. असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे. त्यामुळे संबंधीत विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या रस्त्याची नव्याने डांबरीकरण करून सोयीचे करावे, या रस्त्याची दुरस्ती झाल्यास अतिदुर्गम भागातील नागरिकांना सोयीचे ठरणार आहे.
रस्त्याची अवस्था
रस्ता खचला जाऊन, रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहे. तसेच पुलाच्या संरक्षण भिंत तुटले आहे. तर काहीचे जोरदार पावसामुळे संरक्षण भिंतच पाण्यात गेले. तर काही पूल कोडण्याचा मार्गी आहे. काही पुलावर लोखंडी छड्या बाहेर निघाल्या आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मागे दोन वर्षांपूर्वी वाहधरकांनी स्वत:च्या खर्षात पडलेल्या खड्यात मुरूम टाकून बुजविले होते. मात्र, रस्त्याची अवस्था पुन्हा तशीच झाली आहे. त्यामुळे अपघात होण्याची वाट न पाहता संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नव्याने डांबरीकरण करून सोयीचे करावे असे नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त होत आहे.








