नंदूरबार | प्रतिनिधी
आदिवासी विकास विभाग व महाराष्ट्र शासनाने कोरोना काळात आदिवासी बांधवांसाठी अतिशय महत्त्वकांक्षी अशी खावटी अनुदान योजना सुरू केलेली होती .मात्र याचा लाभ नंदुरबार या जिल्ह्याच्या ठिकाणीच पाठपुरावा करूनही भेटला नाही.त्यामुळे सर्व कुटुंबतर्फे आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला आहे.
आदिवासी विकास विभाग व महाराष्ट्र शासनाने कोरोना काळात आदिवासी बांधवांसाठी अतिशय महत्त्वकांक्षी अशी खावटी अनुदान योजना सुरू केलेली होती .नंदुरबार जिल्ह्यातील अनेक आदिवासी बांधवांनी या खावटी अनुदान योजनेचा लाभ घेतला, या अनुदानामुळे नक्कीच आदिवासी बांधवांसाठी काही काळ सुखमय झाला.परंतु नंदुरबार शहरातील काही कुटुंबांना अजूनही या योजनेचा लाभ मिळालेला नाही किंबहुना त्यांच्या घरापर्यंत कुणी सर्वे करणारा गेलाच नाही अशी परिस्थिती आहे. सदर योजना आदिवासींसाठी राबवल्या जातात आणि त्या योजना त्यांच्या घरापर्यंत जर पोहोचत नसतील तर अशा योजनांचा काय उपयोग ? समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजनेचा लाभ मिळाला तेव्हाच ती योजना यशस्वी झाली असा अर्थ होतो. नंदुरबार शहरातील हॉटेल गोपी-कमलच्या मागे काही लाभार्थ्यांना अजूनही खावटी अनुदान योजनेचा लाभ मिळालेला नाही. कृपया आपण लवकरात लवकर सदर कुटुंबांना खावटी अनुदान योजनेचा लाभ द्यावा अन्यथा सर्व कुटुंब तर्फे आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला आहे.

सदर कुटुंबांना खावटी निवेदन दिल्यानंतर सतत पाठपुरावा करण्यात येत आहे.परंतु संबंधित अधिकारी नॉटरिचेबल असल्याने संपर्कच होऊ शकत नाहीये. यामुळे या आदिवासींच्या खावटीचे भविष्य अधांतरी आहे असं वाटायला लागलं आहे.लवकरच लाभार्थ्यांना घेऊन प्रकल्प कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल
दिग्विजय राजपुत, सामाजीक कार्यकर्ते,नंदुरबार








