Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अज्ञाताने युवकावर झाडल्या गोळ्या,युवक जखमी, घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

team by team
November 30, 2021
in क्राईम
0
अज्ञाताने युवकावर झाडल्या  गोळ्या,युवक जखमी, घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापुर तालुक्यातील लक्कडकोट गावात काल दि.२९ रोजी सायंकाळी अज्ञात इसमाकडून गोळीबार करण्यात आला. यात एक युवक जखमी झाल्याची घटना घडली आहे.माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षकांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी पोहोचला होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र व गुजरात सीमावर्ती भागात असलेल्या नवापूर तालुक्यातील लक्कडकोट येथे सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास . एका वाहनातून काळे जॅकेट व टोपी घातलेले दोन जण लक्कडकोटला आले . चिकन सेंटरवर बसलेल्या प्रवीण गावित यास पार्सल आहे का ? अशी विचारणा केली व त्याच्या दिशेने गोळीबार केला . त्यात प्रवीण गावित नावाचा युवक जखमी झाला आहे. प्रवीणच्या दिशेने दोन राउंड फायर करण्यात आले होते. दोन्ही राउंड मीस फायर झाले असले तरी एक गोळी त्याच्या हाताला चाटून गेल्याने तो किरकोळ जखमी झाला आहे. हा गोळीबार अवैध व्यवसायाच्या भानगडीतुन झाल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे. घटनेची माहिती कळताच जिल्हा पोलिस अधीक्षकांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी पोहोचला होता. रात्रीतून नाकाबंदी करत आरोपीला शोधण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला. मात्र संशयित आरोपी अंधाराचा फायदा घेत तेथून पसार झाले.अद्यापही आरोपी हाती लागलेले नाही.

बातमी शेअर करा
Previous Post

पथदिव्यांच्या प्रकाशाने नंदूरबार शहरातील वसाहती झळाळल्या, नागरी सुविधेत भर: नवापूर चौफुली ते जिल्हा रुग्णालयापर्यंत रस्ते प्रकाशमान

Next Post

रोटरी क्लब नंदनगरीतर्फे संविधान दिन साजरा,मुंबई हल्ल्यातील शहीद पोलीसांना अभिवादन

Next Post
रोटरी क्लब नंदनगरीतर्फे संविधान दिन साजरा,मुंबई हल्ल्यातील शहीद पोलीसांना अभिवादन

रोटरी क्लब नंदनगरीतर्फे संविधान दिन साजरा,मुंबई हल्ल्यातील शहीद पोलीसांना अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add