Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पथदिव्यांच्या प्रकाशाने नंदूरबार शहरातील वसाहती झळाळल्या, नागरी सुविधेत भर: नवापूर चौफुली ते जिल्हा रुग्णालयापर्यंत रस्ते प्रकाशमान

team by team
November 30, 2021
in राजकीय
0
पथदिव्यांच्या प्रकाशाने नंदूरबार शहरातील वसाहती झळाळल्या, नागरी सुविधेत भर: नवापूर चौफुली ते जिल्हा रुग्णालयापर्यंत रस्ते प्रकाशमान

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार नगरपरिषदेच्या विद्युत विभागाकडून पथदिव्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. शहरातील अनेक वसाहतींमध्ये नवीन पथदिवे बसवल्याने परिसर प्रकाशमान झाले आहेत.नवापूर चौफुली ते जिल्हा रुग्णालय पर्यंत पथदिवे बसविण्यात आले असून,दोन्ही घरकुलांमध्ये विद्युत रोहित्र बसविण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

नंदुरबार शहरातील नवापूर चौफुली ते जिल्हा रुग्णालय परिसरात विद्युत व्यवस्था नव्हती. जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना विद्युत व्यवस्था नसल्यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची बाब शिवसेनेचे नेते तथा माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना सूचना केल्या. त्यानंतर विद्युत विभागाचा पथकाने काम हाती घेतले. नवापूर चौफुली ते जिल्हा रुग्णालयापर्यंत परिसरातील रस्त्यावर नवीन 25 विद्युत खांबसह दिवे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची सोय झाली.

नंदुरबार शहरातील मध्यवर्ती ठिकाणी तसेच नवीन वसाहतीमध्ये शेकडोंवर विद्युत खांब व त्यावर दिव्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. विद्युत दिव्यांच्या झगमगाटामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली असून, परिसरातील नागरिकांची सोय झाली आहे. पालिकेचे विद्युत पथकातील कर्मचारी शहरातील विविध भागात जाऊन देखभाल दुरुस्तीची कामे करीत आहेत.

दिव्यांचा लखलखाट

शहरात 100 पेक्षा जास्त नवीन विद्युत खांबसह व दिवे लावण्यात आले आहेत. त्यामुळे परिसरात दिव्यांच्या लखलखाटात दिसून येत आहे. नगरपालिकेकडून दिव्यांची सोय झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

घरकुलांमध्ये विद्युत रोहित्र

भोणे फाट्याजवळील घरकुल व जिल्हा रुग्णालय परिसरातील घरकुलांमध्ये पालिकेकडून विद्युत रोहित्र बसविण्यात आले आहेत. दोन्ही ठिकाणी 200 केव्ही क्षमतेचे रोहित्र असून,पथदिव्यांची सोय करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

ग्रामिण स्वच्छता सर्वेक्षण प्रशिक्षण उत्साहात

Next Post

अज्ञाताने युवकावर झाडल्या गोळ्या,युवक जखमी, घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

Next Post
अज्ञाताने युवकावर झाडल्या  गोळ्या,युवक जखमी, घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

अज्ञाताने युवकावर झाडल्या गोळ्या,युवक जखमी, घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add