नंदूरबार l प्रतिनिधी

युवासेनेचे माजी जिल्हाधिकारी राहुल संतोष चौधरी यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी त्यांचे स्वागत केले.
युवा सेनेचे माजी जिल्हाधिकारी राहुल चौधरी गेल्या अनेक दिवसांपासून भाजप जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या संपर्कात होते त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी काल शनिवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी त्यांच्या सोबत असंख्य कार्यकर्ते देखील पक्षात दाखल झाले. यावेळी जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, आ.राजेश पाडवी, मा.आ. शिरीष चौधरी, संघटन सरचिटणीस निलेश माळी उपस्थित होते.









