नंदुरबार | प्रतिनिधी

महाराष्ट्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून श्री. दरेकर यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री l.दरेकर हे सकाळी 9 वाजता मुंबईहून चाळीसगाव येथे पोहोचतील, चाळीसगावहुन निघाल्यानंतर 11.30 वाजता शहादा येथे सातपुडा साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ करतील. हा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर श्री दरेकर हे नंदुरबार येथील भाजपा जिल्हाध्यक्ष विजय भाऊ चौधरी यांच्या निवासस्थानी दुपारी 3 वाजता भेट देतील त्यानंतर श्री. दरेकर हे कुसुंबा मालेगाव मार्ग शिर्डी येथे रवाना होतील.
भाजपा जिल्हा कार्यालय येथे दुपारी 3 वाजता महाराष्ट्र विधान परिषद विरोधी पक्ष नेते श्री.दरेकर यांचा जिल्हा भाजपच्या वतीने सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रम प्रसंगी जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे अशी विनंती भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केली आहे.









