नंदुरबार l प्रतिनिधी
अखिल भारतीय श्री.स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिक दिंडोरी प्रणित मार्गाचे गुरुमाऊली चंद्रकांत दादा मोरे यांच्या आशीर्वादाने व गुरुपुत्र नितीन मोरे यांच्या सूचक कल्पनेतून व मार्गदर्शन च्या माध्यमातून बाल संस्कार व युवा प्रबोधन विभाग यांच्या प्रेरणेने नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी जीवन देवरे यांच्या कुशल मार्गदर्शन व नियोजनानुसार नंदुरबार शहर श्री.स्वामी समर्थ मार्ग नंदुरबार जिल्ह्याशी संपर्कात असलेले धडगाव तालुका शहादा तालुका नंदुरबार तालुका शिंदखेडा तालुका शिरपूर तालुका भुसावल तालुका अशा विविध अशा ठिकाणी एक दिवसीय हिवाळी बालसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले. सदर एक दिवसीय हिवाळी बालसंस्कार शिबीरामध्ये संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातून व जिल्हा केंद्राच्या माध्यमातून चालणार्या बालसंस्कार केंद्रामध्ये ५१ ठिकाणी जवळजवळ ५००० मुलांनी यामध्ये सहभाग नोंदवला.

याप्रसंगी नंदुरबार जिल्हा केंद्र प्रतिनिधी जीवन देवरे यांनी श्री.स्वामी समर्थ सेवा केंद्र भुसावळ येथून ऑनलाइन पद्धतीने आयोजन होत असलेल्या शिबिराच्या ठिकाणी मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग हा केवळ अध्यात्मिक मार्ग नसून २० टक्के अध्यात्म व ८० टक्के परोपकार या माध्यमातून कार्य करीत असतात,परमपूज्य गुरु माऊली यांना संस्कारक्षम भारत घडविण्यास हातभार लावावा यादृष्टीने मुलांना बालवयातच संस्काराचे धडे दिल्यास त्या माध्यमातून भविष्यातील सुजाण नागरिक घडण्यास मदत होईल राष्ट्र उभारण्यासाठी आवश्यक असलेले विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणे त्या माध्यमातून संस्कारक्षम पिढी घडवणे हेच श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे एक अंतिम सत्य असून त्याच मार्गावर सर्वांनी मार्गक्रमण करावं अशी परमपूज्य गुरुमाऊलींच्या कार्याला आपण सर्वांनी हातभार लावावा असे आवाहन केले.
श्री.स्वामी समर्थ सेवा केंद्र नंदुरबार शहराच्या वतीने श्री.स्वामी समर्थ प्रशिक्षण केंद्र चौपाळे रोड नंदुरबार येथे आयोजित करण्यात आले. हिवाळी बाल संस्कार शिबिराची सुरुवात बाल संस्कार विभागातील सेवेकर्यांपैकी विविध थोर समाजसुधारकांच्या वेशभूषा धारण केलेल्या शूरवीरा व उपस्थित मान्यवर तसेच कार्यरत सेवेकरी यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन व बालवीर शहीद शिरीषकुमार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून हिवाळी बाल संस्कार शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता निर्माण व्हावी यादृष्टीने डॉ.चंद्रशेखर आनंदराव वसईकर यांनी बालसंस्कार शिबिरातील सेवेकरींकडून ध्यानधारणा करून त्यांचे महत्त्व विश्लेषण केले.
यावेळी सेवेकर्यांनी श्री.स्वामी समर्थ जप, श्री.गणपती स्तोत्र,श्री.प्रज्ञाविवर्धन स्तोत्र,सरस्वती स्तोत्र व गणपती अथर्व शिष्य शिबिरार्थी कडून म्हणून घेतले.
बालसंस्कातील सेवेकरी भाऊ यांनी आपल्या भारत देशाला लाभलेले समाजसुधारक व विचारवंत असलेले राजमाता जिजाबाई, विरांगणा राणी लक्ष्मीबाई,कवयित्री बहिणाबाई चौधरी, आद्य शंकराचार्य, शिवाजी महाराज, बिरसा मुंडा, स्वामी विवेकानंद, शिरीष कुमार यांची वेशभूषा धारण करून त्यांचे विचार व त्यांची कृती सादर करून समाज प्रबोधन केले.
शिशु संस्कार विभागाच्या माध्यमातून ० ते ८ वयोगटातील बाल सेवेकर्यांनी मसाल्याच्या डब्यातील पदार्थ ओळखलेत,डोळ्याला पट्टी बांधून चवी द्वारे पदार्थांची ओळख करून दिली तसेच बाल संस्कार विभागाच्या माध्यमातून क्युब बनवण्याचे प्रशिक्षण व महत्त्व सांगण्यात आले. संकटकाळात सेवेकरी यांनी आपले स्वतःचे संरक्षण कसे करावे यासाठी श्री संतोष मराठे यांनी कराटे द्वारे प्रात्यक्षिक दाखवून स्वसंरक्षणाचे धडे दिलेत.
सदर शिबिरात श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित मार्गातील १८ ग्राम अभियानाचे प्रकार व स्वरूप विभाग विविध प्रकारचे खाद्यपदार्थ ग्रंथप्रदर्शन आदींचे प्रशिक्षण स्टॉलच्या माध्यमातून देण्यात आले
यानंतर शिबिरार्थी यांच्या कलागुणांना वाव मिळावा या दृष्टीने रांगोळी,चित्रकला व निबंध अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्यात प्रथम सचिता देसले ,द्वितीय प्रियांश चौधरी , तृतीय मयुरी कासार तर रांगोळी स्पर्धेत- प्रथम कावेरी गायकवाड, द्वितीय जान्हवी गिरासे, तृतीय आदिती शिंदे तर निबंध स्पर्धेत, प्रथम उन्नती नंदकिशोर सैंदाणे द्वितीयदक्ष प्रविण चौधरी,तृतीय संस्कार संभाजी मुंडे यांना अनुक्रमे श्री सरस्वतीपूजन संच,बालसंस्कार ग्रंथ, प्रमाणपत्र मान्यवर व सेवेकरी यांच्याहस्ते समारंभपूर्वक देण्यात आले सदर शिबिरास प्राचार्य डॉ.महेंद्र रघुवंश, प्राचार्य पुष्पेन्द्र रघुवंशी,डॉ. अविनाश पाटील, अनिता पाटील, देवेंद्र कुलकर्णी, प्रदीप देसले, प्रा.हेमंत सूर्यवंशी, कपिल बोरसे आदींनी भेट देऊन आनंद व्यक्त केला व शिबिरार्थीचे कौतुक केले. हिवाळी बाल संस्कार शिबिराची सांगता संगीत वाद्याच्या साह्याने पसायदान व राष्ट्रगीताने करण्यात आली सदर हिवाळी बाल संस्कार शिबिराच्या यशस्वीतेसाठी श्री स्वामी समर्थ सेवेकरी भाऊ,काका,ताई व मावशी या सेवेकर्यांना सहकार्य केले.








