धुळे l प्रतिनिधी
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार स्थानिक स्वराज्य प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार 10 डिसेंबर 2021 रोजी मतदान, तर 14 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने दहा मतदान केंद्रांना मान्यता दिली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप जगदाळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये दिली आहे.
मतदान केंद्रांची नावे अशी (अनुक्रमे मतदान केंद्राचे ठिकाण, मतदान केंद्रास जोडण्यात आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील मतदारांचा तपशील, एकूण मतदार या क्रमाने) : तहसीलदार यांचे दालन, तहसील कार्यालय, धुळे ग्रामीण, धुळे तालुका क्षेत्रातील धुळे जिल्हा परिषदेचे सदस्य, धुळे पंचायत समितीचे सभापती, धुळे महानगरपालिकेचे सदस्य, 93. तहसीलदार यांचे दालन, तहसील कार्यालय, साक्री, जि. धुळे, साक्री तालुका क्षेत्रातील धुळे जिल्हा परिषदेचे सदस्य, साक्री पंचायत समितीचे सभापती, 18. तहसीलदार यांचे दालन, तहसील कार्यालय, शिंदखेडा, जि. धुळे, शिंदखेडा तालुका क्षेत्रातील धुळे जिल्हा परिषदेचे सदस्य, शिंदखेडा पंचायत समितीचे सभापती, दोंडाईचा- वरवाडे नगरपरिषदेचे सदस्य, नगरपंचायत, शिंदखेडाचे सदस्य, 58. तहसीलदार यांचे दालन, तहसील कार्यालय, शिरपूर, जि. धुळे (नवीन इमारत), शिरपूर तालुका क्षेत्रातील धुळे जिल्हा परिषदेचे सदस्य, शिरपूर पंचायत समितीचे सभापती, शिरपूर- वरवाडे नगरपरिषदेचे सदस्य, 47.
तहसीलदार यांचे दालन, तहसील कार्यालय, नंदुरबार, जि. नंदुरबार, नंदुरबार तालुका क्षेत्रातील नंदुरबार जिल्हा परिषदेचे सदस्य, नंदुरबार पंचायत समितीचे सभापती, नंदुरबार नगरपालिकेचे सदस्य, 55. तहसीलदार यांचे दालन, तहसील कार्यालय, नवापूर, जि. नंदुरबार, नवापूर तालुका क्षेत्रातील नंदुरबार जिल्हा परिषदेचे सदस्य, नवापूर पंचायत समितीचे सभापती, नवापूर नगरपरिषदेचे सदस्य, 33. तहसीलदार यांचे दालन, तहसील कार्यालय, शहादा, जि. नंदुरबार, शहादा तालुका क्षेत्रातील नंदुरबार जिल्हा परिषदेचे सदस्य, शहादा पंचायत समितीचे सभापती, शहादा नगरपरिषदेचे सदस्य, 45. तहसीलदार यांचे दालन, तहसील कार्यालय अक्राणी, जि. नंदुरबार, अक्राणी तालुका क्षेत्रातील नंदुरबार जिल्हा परिषदेचे सदस्य, अक्राणी पंचायत समितीचे सभापती, 8. तहसीलदार यांचे दालन, तहसील कार्यालय, तळोदा, जि. नंदुरबार, तळोदा तालुका क्षेत्रातील नंदुरबार जिल्हा परिषदेचे सदस्य, तळोदा पंचायत समितीचे सभापती, तळोदा नगरपरिषदेचे सदस्य, 27. तहसीलदार यांचे दालन, तहसील कार्यालय, अक्कलकुवा, जि. नंदुरबार, अक्कलकुवा तालुका क्षेत्रातील नंदुरबार जिल्हा परिषदेचे सदस्य, अक्कलकुवा पंचायत समितीचे सभापती, 11. एकूण दहा मतदान केंद्रे असतील. एकूण मतदारांची संख्या 395 अशी आहे, असेही जिल्हाधिकारी श्री. जगदाळे यांनी कळविले आहे.








