नंदुरबार l प्रतिनिधी
नवापुर तालुक्यातील भवरे गावातील उचळीफळी व जामतलाव गावालगत असलेल्या आजूबाजूच्या शेतात अवैध रीतीने ठेवलेले साग् व खैर जातीचे तीन लाखाचे लाकूड नवापूर वनक्षेत्राच्या पथकाने जप्त करत गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वृत्त असे की सहाय्यक वनसंरक्षक नंदुरबार यांना मिळालेल्या गुप्त माहितीवर वनक्षेत्रपाल नवापूर प्रादेशिक व वनक्षेत्र पथक नवापूर प्रादेशिक यांच्या संयुक्त विद्यमाने भवरे गावातील उचळीफळी व जामतलाव गावालगतच्या आजूबाजूच्या शेतात ठिक ठिकाणी कुर्हाडीने घडतळ केलेले अवैधरीत्या साठवलेले साग् जातीचे लाकूड साग चौपाट नग ३८ व खैर जातीचे लाकडाचे १२२ नग मिळून आले. सदर मालाची किंमत बाजारभावानुसार अंदाजीत अडीच ते तीन लाख असून ते नवापूर कार्यालयात जप्त करण्यात आले आहे.सदरची कामगिरी उपवनसंरक्षक नंदुरबार वनविभाग शहादा विभागीय वन अधिकारी दक्षता धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली धनंजय पवार सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार स्नेहल अवसरमल, वनक्षेत्रपाल नवापूर प्रदेशी व नवापूर वनक्षेत्र स्टाप शिवाजी दराडे, वनपाल खेकडा ए.एम.शेख, वनपाल बोरझर आरती नगराळे, वनरक्षक कल्पेश आहिरे,कमलेश वसावे, संतोष गायकवाड, विकास शिंदे, अमोल गावित, भाग्यश्री पावरा, गिरीश वळवी, अशोक पावरा, अनिल वळवी, लक्ष्मण पवार, वनमजूर बाळा गावित,अनिल गावित यांच्या पथकाने केले आहे. वन व वन्यजीव तसेच अवैधवाहतूक लाकूड संबधित कुठाला गैरप्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ टोल फ्री नंबर १९२६ वर संपर्क करावा असे आवाहन वनविभागाने केले आहे.








