नंदुरबार l प्रतिनिधी
ईपीएस ९५ निवृत्त कर्मचारी समन्वय व लोककल्याण संस्था ( राष्ट्रीय ) तसेच राष्ट्रीय संघर्ष समिती नंदुरबार जिल्हा संघटनेच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ नोव्हेंबर रोजी शहादा येथे जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
पेन्शनर्स बचाव आंदोलनाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील ई.पी.एस.१९९५ पेन्शन धारकांसाठी जिल्हा मेळावा निमित्ताने सभेचे आयोजन केले आहे. गेल्या ६ वर्षांपासून अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखाली पेन्शनर्सच्या न्याय्य मागण्यांसंदर्भात तालुका स्तरावरुन देशस्तरावर विविध आंदोलनाद्वारे संघर्ष सुरू आहे. गेल्या तिन वर्षांपासून संघटनेचे मुख्यालय बुलढाणा येथे कोरोना काळात देखील साखळी उपोषण सुरू असून देशभरातील विविध राज्यांतील हजारो पेन्शनर्स आंदोलन स्थळी उपोषणात सहभागी होत आहेत. देशभरातील सर्व खासदारांना मागण्यांसंदर्भात निवेदन दिलेली आहे. पंतप्रधानांना देखील प्रश्न सोडविण्यासाठी पत्र दिलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील याबाबत आश्वासन दिलेले आहे. तसेच आतापर्यंत संघटनेच्या वतीने केलेल्या प्रयत्नांविषयी पेन्शनर्सना माहिती मिळावी म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील पेन्शनर्ससाठी शहादा येथे या विशेष सभेचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्हा मेळावा रामदेव बाबा नगर, बायपास रोड, गोकर्ण महादेव मंदीर जवळील श्री संत सेना नाभिक समाज सेवा मंडळ सभागृहात २८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता होणार आहे. मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष देविसिंग जाधव, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष नारायणराव होन, जळगाव जिल्हाध्यक्ष अरविंद भारंबे, जळगाव जिल्हा उपाध्यक्ष रमेश नेमाडे, जळगाव जिल्हा सरचिटणीस डी एन पाटील, जळगाव जिल्हा कोषाध्यक्ष, उमाकांत चौधरी, धुळे जिल्हा उपाध्यक्ष ए. वाय. सोनवणे, धुळे जिल्हा सरचिटणीस जे.आर. सुर्यवंशी, भुसावळ तालुकाध्यक्ष एम. एम. सरोदे, भुसावळ तालुका सचिव पांडुरंग महाजन, साक्री तालुकाध्यक्ष अनिल भामरे, शिंदखेडा तालुकाध्यक्ष दिलीप चौधरी, धुळे जिल्हा बँक माजी व्यवस्थापक अरुण साळुंके आदी उपस्थित राहणार आहेत. तरी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पेन्शनधारकांनी सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन नंदुरबार जिल्हाध्यक्ष गोरख माळी व राष्ट्रिय संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.








