नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक, संदीप निंबा पाटोळे यांच्या कविता जर्मनीतील ब्रावो मराठी मंडळाने ‘शुभंकरोती’ या दिवाळी अंकात प्रकाशित केल्या आहेत. या दिवाळी अंकात मराठी,हिंदी, इंग्रजी आणि जर्मनी या चार भाषांचा समावेश आहे.
भारताबाहेर राहून भारतीय परंपरा जपणारा भारतीय माणूस दिवाळीच्या प्रकाश पर्व आणि साहित्याची मेजवानी असणाऱ्या शुभंकरोती 2021 हा दिवाळी अंकाची भारतीय परंपरा ब्रावो मराठी मंडळाने भारताबाहेरही कायम राखली आहे. हा दिवाळी अंक भारत आणि जर्मनी स्थित लेखक, कवीच्या साहित्याने प्रकाशित केला. शुभंकरोती या दिवाळी अंकात अनुभव, मुलाखत, प्रवासवर्णन,कथा, लेख, कविता आणि पाककृती यांचा समावेश आहे वाचकांना नक्कीच साहित्य मेजवानी मिळणार आहे मुंबई पुण्याच्या साहित्यिकानंतर नंदुरबार येथील कवी संदीप पाटोळे यांच्या चार कविता यात आहेत. हा दिवाळी अंक जर्मनीतील हॅम्बर्ग शहरात प्रकाशित करण्यात आला. या दिवाळी अंकाचे संपादक किरण गायकवाड व सौ.सुगंधा रागडवार आहेत. याव्यतिरिक्त दिवाळी अंक 2021 या वर्षात पुण्यनगरी, लोकदीप,मनोकल्प, निहार, पुरुष उवाच, सर्वोत्तम, तुषार, साहित्य आनंद, म्हसळा टाईम्स, शब्द गांधार, लोकशाही,रंगतदार व इतर दिवाळी अंकात कवी संदिप पाटोळे यांचे साहित्य प्रकाशित झाले आहे.तसेच तरुण भारत नागपूर आसमंत पुरवणी,नवाकाळ मुंबई,लोकशाही वार्ता नागपूर प्रतिबिंब पुरवणी,आपला महाराष्ट्र बहर पुरवणी,सायबर क्राईम औरंगाबाद, विदर्भ मतदार अमरावती,अजिंक्य भारत अकोला,कृषकोन्नती नागपूर,एकमत साक्षी पुरवणी लातूर व इतर वृत्तपत्रात कविता प्रकाशित होत असतात.तसेच 2022 मध्ये “निसिंधू” हा काव्यसंग्रह वाचक रसिकांच्या भेटीस येत आहे.