नंदुरबार | प्रतिनिधी
धुळे व नंदुरबार जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या जागेसाठी दि. १० डिसेंबरला मतदान होणार आहे . आज नंदुरबार पालिकेचे विद्यमान नगरसेवक दिपक प्रभाकर दिघे यांनी अपक्ष नामांकन दाखल केले.
धुळे व नंदुरबार जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या जागेसाठी दि. १० डिसेंबरला मतदान होणार आहे .निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज २३ नोव्हेंबर रोजी शेवटची मुदत आहे .दरम्यान आज नंदुरबार पालिकेचे विद्यमान नगरसेवक दिपक प्रभाकर दिघे यांनी आज अपक्ष अर्ज धुळे जिल्हाधिकारी यांच्या कडे दाखल केले.यावेळी नंदुरबार पालिकेचे पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील,नगरसेवक कुणाल वसावे, परवेझ खान आदी उपस्थित होते. विद्यमान नगरसेवक दिपक प्रभाकर दिघे हे माजी.आ.चंद्रकांत रघुवंशी यांचे खंदे समर्थक आहेत.
दरम्यान अर्ज दाखल करण्याच्या दिवशीच महविकास आघाडीत फूट पडल्याचे चित्र आहे.








