नंदुरबार | प्रतिनिधी
धुळे व नंदुरबार जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या जागेसाठी दि. १० डिसेंबरला मतदान होणार आहे . आज दि.२३ रोजी नंदुरबार पालिकेचे विद्यमान नगरसेवक दिपक प्रभाकर दिघे हे आज अर्ज दाखल करणार आहेत.अर्ज दाखल करण्यासाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आहेत.
धुळे व नंदुरबार जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या जागेसाठी दि. १० डिसेंबरला मतदान होणार आहे .निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज २३ नोव्हेंबर रोजी शेवटची मुदत आहे .दरम्यान आज नंदुरबार पालिकेचे विद्यमान नगरसेवक दिपक प्रभाकर दिघे हे अर्ज दाखल करण्यासाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आहेत. विद्यमान नगरसेवक दिपक प्रभाकर दिघे हे माजी.आ.चंद्रकांत रघुवंशी यांचे खंदे समर्थक आहेत. यावेळी त्यांच्या समवेत नंदुरबार येथील सर्व काँग्रेसचे व शिवसेनेचे नगरसेवक आहेत.








