Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी जिल्ह्यात आज ८ केंद्रांत होणार मतदान

team by team
November 21, 2021
in राजकीय
0
धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी जिल्ह्यात आज ८ केंद्रांत होणार मतदान

नंदुरबार  l प्रतिनिधी
धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी आज दि.२१ रविवारी रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होईल . नंदुरबार जिल्ह्यातील सहा ठिकाणी ८ केंद्रांत मतदान होईल . बँकेच्या नऊ गटातून १० जागांसाठी २० उमेदवार रिंगणात आहेत . मतदानासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून , मतदान साहित्यासह कर्मचारी सायंकाळपर्यंत मतदान केंद्रात पोहोचले .
धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १७ पैकी ७ जागा बिनविरोध झाल्या आहेत . सर्वसमावेशक शेतकरी विकास पॅनल व विरोधकांमध्ये समोरासमोर लढत होणार आहे . नंदुरबार वि . का . सोसायटी मतदारसंघात माजी आमदार चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी आणि पावबा माधवराव धनगर यांच्यात लढत आहे . या गटात ६९ मतदार मतदान करतील . अक्राणी महल वि . का . सोसायटीच्या जागेसाठी संदीप मोहन वळवी व विलास पुनाजी पाडवी यांच्यात लढत असून १६ मतदार आहे . नवापूर वि . का . सोसायटीच्या जागेसाठी अभिमन फुलसिंग वसावे विरुद्ध अमरसिंग हुरजी गावित यांच्यात लढत होत असून , १७ मतदार आहेत . विमुक्त जाती , भटक्या जमाती किंवा विशेष मागासवर्गीय जागेसाठी दर्यावगीर दौलतगीर महंत विरुद्ध सुरेश फकिरा शिंत्रे यांच्यात लढत आहे . सर्व मतदार संघातून ९८३ मतदार मतदान करतील .कृषी पणन संस्था व शेतीमाल प्रक्रिया संस्थेच्या जागेसाठी शेतकरी विकास पॅनलतर्फे विद्यमान चेअरमन राजवर्धन कदमबांडे विरुद्ध अंकुश विक्रम पाटील यांच्यात लढत आहे . या गटात १४४ मतदार आहेत .या निवडणुकीसाठी नंदुरबार महात्मा गांधी विद्यामंदिर , नगरपालिका शाळा नंबर १५ ( २ केंद्र ) , शहादा म्युनिसिपल आर्टस , कॉमर्स व सायन्स कॉलेज ( २ केंद्र ) , नवापूर आदर्श मराठी शाळा ( १ केंद्र ) , तळोदा नगरपालिका शाळा नंबर ६ ( १ केंद्र ) , अक्कलकुवा जिल्हा परिषद कन्या शाळा नंबर ३ ( १ केंद्र ) , अक्राणीमहल ( धडगाव ) कै . पी . सी . पराडके माध्यमिक कन्या शाळा ( १ केंद्र ) अशा ६ ठिकाणी ८ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडेल .सोमवार दि.२२ नोव्हेंबर रोजी धुळे येथील वाडीभोकर रस्त्यावरील पारस मंगल कार्यालयात मतमोजणी होणार आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे मुलनिवासी कर्मचारी कल्याण महासंघाचे अधिवेशन

Next Post

नंदुरबार येथे क्राईम ब्रांचचे पोलीस असल्याची बतावणी करून व्यापाऱ्याला लुटले

Next Post
नंदुरबार येथे क्राईम ब्रांचचे पोलीस असल्याची बतावणी करून व्यापाऱ्याला लुटले

नंदुरबार येथे क्राईम ब्रांचचे पोलीस असल्याची बतावणी करून व्यापाऱ्याला लुटले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add