नंदुरबार l प्रतिनिधी
येथील मुलनिवासी कर्मचारी कल्याण महासंघ, नंदुरबार जिल्हाच्यावतीने शासकीय कर्मचार्यांच्या समस्यांवर जनजागृती अभियानाअंतर्गत जिल्हा अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.२८ नोव्हेंबर २०२१ रोजी रविवारी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत राजे शिवाजी विद्यालय, हेमंतनगर (शहादा रोड) नंदुरबार येथे हे अधिवेशन होणार आहे. अधिवेशनाचे उदघाटन माध्यमिक शिक्षक व्ही.एम. पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तर प्रमुख वक्ते बहुजन पॉवर कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष सुलेमान तडवी, बामसेफचे राज्य कार्यकारिणी सदस्य इरफान सैय्यद, अनिसचे बलदेव वसईकर, प्राथमिक शिक्षक हिमांशु बोरसे असणार आहेत. तर अध्यक्षस्थानी मुलनिवासी कर्मचारी कल्याण महासंघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य शैलेंद्र वाघमारे हे असणार आहेत. तरी शासकीय कर्मचार्यांच्या समस्यांवर होणार्या या अधिवेशनास मोठ्या संख्येने शासकीय कर्मचार्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नंदुरबार जिल्हा कार्यकारिणीचे हेमकांत मोरे, हनीफ पठाण, विशाल चहांदे, महेंद्र सोनवणे, रमेश बिरारे, अशोक ढंढोरे, रमेश म्हसदे, गांगुर्डे जी., अशोक पवार, आर.डी.पाटील, युवराज पानपाटील यांनी केले आहे.