तळोदा l प्रतिनिधी
तळोदा पोलीस ठाण्यातील पो.कॉ नरेश जगदाळे (44) हे दि. 11 ऑक्टोंबर 2021 पासून बेपत्ता झाले आहेत.त्यांच्या कुटुंबीयांकडून व नातेवाईकांकडून शोध घेण्यात आला असून ते आढळून आलेले नाहीत. यामुळे त्यांचा शोध घेण्यात यावा अशी मागणी पो.कॉ नरेश जगदाळे यांचे वडील बुधा जगदाळे यांनी केली असून स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलीस निरीक्षकाना याबाबत निवेदन दिले आहे.










