Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आ.अमरीश पटेल यांच्या विरोधात गौरव वाणींसह चार नावांची चर्चा

team by team
November 20, 2021
in राजकीय
0
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आ.अमरीश पटेल यांच्या विरोधात गौरव वाणींसह चार नावांची चर्चा

नंदुरबार | प्रतिनिधी
धुळे व नंदुरबार जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या जागेसाठी दि. १० डिसेंबरला मतदान होणार आहे .भाजपच्या महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठकीत भाजपकडून आमदार अमरीश पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे . तर अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस बाकी असतांना  विरोधी गटातर्फे उमेदवाराचे नाव घोषित झालेले नाही . निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत २३ नोव्हेंबर आहे .मात्र कॉंग्रेसनेही निवडणूक लढवण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी नंदुरबार व धुळे जिल्ह्यातून काही नावेही कॉंग्रेस निवडणूक समितीने मागविली आहे. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातून जिल्हा कॉंग्रेसचे कार्यध्यक्ष दिलीप नाईक, जिल्हा परिषद सदस्य हेमलता शितोळे, तळोदा येथील माजी उपनगराध्यक्ष व गटनेते गौरव वाणी यांच्या नावाबरोबरच धुळ्याचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांच्या नावाची चर्चा असुन या सर्वांना अर्ज भरण्याकामी लागणारी सर्व कागदपत्रे तयार ठेवण्याचे आदेशही देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.


निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाली . तसेच अर्ज भरण्याची विद्यमान प्रक्रियाही सुरू झाली . धुळे व नंदुरबार जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या जागेसाठी दि. १० डिसेंबरला मतदान होणार आहे .निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत २३ नोव्हेंबर आहे .अर्ज भरण्याची विद्यमान प्रक्रियाही सुरू झाली . पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही .दरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत भाजपच्या महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक झाली . बैठकीत धुळे – नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या जागेसाठी विद्यमान आमदार अमरीश पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले . विरोधकांकडून अद्याप अधिकृत भूमिका जाहीर झालेली नाही . निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत दि.२३ नोव्हेंबर आहे . तथापि कॉंग्रेस चा उमेदवार अजूनही निश्चित झालेला नाही. सहाजिकच ही निवडणूक बिनविरोध होण्याची अटकळ बांधली जात असतांना कॉंग्रेसनेही निवडणूक लढवण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी नंदुरबार व धुळे जिल्ह्यातून काही नावेही कॉंग्रेस निवडणूक समितीने मागविली आहे. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातून जिल्हा कॉंग्रेस चे कार्यध्यक्ष दिलीप नाईक, जिल्हा परिषद सदस्य हेमलता शितोळे, तळोदा येथील माजी उपनगराध्यक्ष व गटनेते गौरव वाणी यांच्या नावाबरोबरच धुळ्याचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांच्या नावाची चर्चा असुन या सर्वांना अर्ज भरण्याकामी लागणारी सर्व कागदपत्रे तयार ठेवण्याचे आदेशही देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान तळोदा नगरपालिकेचे कॉंग्रेसचे गटनेते गौरव वाणी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी निवडणुकीसाठी कागदपत्रे तयार ठेवण्याचे आदेश मिळाले असल्याचे सांगितले.
धुळे व नंदुरबार जिल्ह्यात दहा मतदान केंद्र करण्यात आली आहेत . प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयात मतदान केंद्र असनार आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

शनिमांडळ येथील युवकाचा खुनाचा गुन्ह्याची उकल करण्यात पोलीसांना यश, ३ आरोपींना अटक

Next Post

चिखली येथे जि. प. आरोग्य व शिक्षण सभापती अजित नाईक यांची लसीकरण केंद्रास भेट

Next Post
चिखली येथे जि. प. आरोग्य व शिक्षण सभापती अजित नाईक यांची लसीकरण केंद्रास भेट

चिखली येथे जि. प. आरोग्य व शिक्षण सभापती अजित नाईक यांची लसीकरण केंद्रास भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add