Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा आगारातून धडगावसाठी पोलीस बंदोबस्तात पाच प्रवाशांसह पहिली बस रवाना झाली आणि काकडदा जवळ बस अचानक थांबली

team by team
November 20, 2021
in क्राईम
0
शहादा आगारातून धडगावसाठी पोलीस बंदोबस्तात पाच प्रवाशांसह पहिली बस रवाना झाली आणि  काकडदा जवळ बस अचानक थांबली

शहादा l प्रतिनिधी
गेल्या १६ दिवसांपासून राज्यात एस . टी . कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना काल शहादा आगारातून धडगावसाठी पोलिसांच्या संरक्षणात पाच प्रवाशांसह पहिली बस रवाना करण्यात आली होती .मात्र धडगाव तालुक्यातील काकडदा गावाजवळ अचानक बस चालवत असताना चालकाला हृदय विकाराचा त्रास होवू लागल्याने त्यांनी बस रस्त्याच्या कडेला उभी केली . बसवाहक व प्रवाशांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की, राज्यात गेल्या
१६ दिवसांपासून एस . टी . चे शासकीय सेवेत विलीनीकरणासाठी संप सुरू आहे.त्यामुळे एक ही बस आगाराच्या बाहेर पडली नाही, काल दि . १ ९ रोजी सकाळी साडेअकरा वाजता शहादा बसस्थानकातून शहादा धडगाव ही बस ( क्र . एमएच २० बीएल ० ९ १६ ) शहादा पोलिसांच्या संरक्षणात चालक अशोक कोळी व वाहक रवींद्र शिरसाठ यांच्यासह बसमध्ये पाच प्रवासी धडगावसाठी रवाना झाले होते . या बसला शहादा पोलिसांनी म्हसावदपर्यंत संरक्षण दिले . तेथून पुढे म्हसावद पोलिसांनी फत्तेपूरपर्यंत संरक्षण दिले होते . त्यानंतर ही बस प्रवाशांना घेऊन धडगावकडे रवाना झाली होती . मात्र रस्त्यातच अतिदुर्गम भाग असलेल्या सातपुडा पर्वतरांगेतील काकडदा गावाजवळ चालक अशोक कोळी यांना छातीत कळा आल्याने त्यांनी प्रसंगावधान राखून बस उभी करत वाहक व प्रवाशांना त्यांना होणाऱ्या त्रासाची जाणीव करून दिली . त्यांनी तत्काळ काकडदा रुग्णालयात त्यांना प्राथमिक उपचारासाठी दाखल करीत शहादा येथील एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली . घटनास्थळी आगारप्रमुख वाय . एस . लिंगायत यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत श्री . कोळी यांना शहादा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केल्याने मोठा अनर्थ टळला आहे . या संपूर्ण घटनेवरून संप सोडून पुन्हा सेवेत हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांची मानसिकता स्थिर नसल्याचे स्पष्ट होत आहे . सध्या संपात सामील न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मोठा दबाव निर्माण झाला आहे . त्या कर्मचाऱ्यांची मानसिकता खचल्याने कालच्या घटनेवरून दिसून आल्याचे बोलले जात आहे .
संपकरी कर्मचाऱ्यांमध्ये अशोक कोळी हे कालपर्यंत सहभागी होते . मात्र पन्नाशीच्या वर वय असल्याने नोकरी जाण्याच्या भीतीपोटी त्यांनी संपातून माघार घेत कामावर येण्याचा निर्णय घेतला होता.

बातमी शेअर करा
Previous Post

बनावट दिव्यांग अंधत्व प्रमाणपत्र सादर करून शासकीय नोकरिस लागलेल्यावर कडक कारवाई करा : कन्हैय्यालाल ढोडरे यांची मागणी

Next Post

कृषी कायदे रद्द केल्याने नंदुरबार जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्यावतीने आनंदोत्सव साजरा

Next Post
कृषी कायदे रद्द केल्याने नंदुरबार जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्यावतीने आनंदोत्सव साजरा

कृषी कायदे रद्द केल्याने नंदुरबार जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्यावतीने आनंदोत्सव साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add