Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे आमदार कार्यालयाजवळ ट्रान्सफॉर्मर जळून खाक

team by team
November 19, 2021
in क्राईम
0
नंदुरबार येथे आमदार कार्यालयाजवळ ट्रान्सफॉर्मर जळून खाक
नंदुरबार | प्रतिनिधी-

शहरातील आमदार कार्यालयाजवळील वीज वितरणच्या ट्रांसफार्मरवरील केबलचे जबरदस्त स्पार्किंग होऊन अचानक आगीचे मोठ्ठे लोळ उठले. हे स्पार्किंग एवढे जबरदस्त होते की दिवाळीचे बॉम्ब फुटावे तसे मोठे आवाज करीत सर्व दिशेने मोठ्या ठिणग्या पडत होत्या. होणारा आवाज आणि भयावह दृष्य पाहून त्याप्रसंगी रस्त्याने जाणारे देखील काही क्षण हादरून गेले . काही मिनिटे खाली स्पार्किंग झाले नंतर ट्रांसफार्मरच्या भोवताली आणि थेट दुसर्‍या पोलपर्यंत तडतडाट करीत वीजांचं तांडव चालावे तसे स्पार्किंग होत अखेरीस मोठा आवाज करून तेथील वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे परिसरात अंधकार पसरला होता.
शहरातील आमदार कार्यालयाच्या बाजूला  असलेल्या  ट्रान्स्फॉर्मरवर काल रात्रीच्या सुमारास अचानक स्पार्कींग सुरु झाली. हे स्पार्किंग एवढे जबरदस्त होते की जणू काही फटाक्यांची आतीषबाजीच होती. स्पार्किंग होता होता ट्रान्स्फॉर्मरने पेटे घेतला. यात ट्रान्स्फॉर्मर पूर्णपणे जळून खाक झाले. या ट्रान्सफॉर्मरजवळच लाखो रुपये किमतीची कार उभी होती. सुदैवाने या कारवर ठिणग्या पडल्या नाही. अन्यथा मोठया प्रमाणावर हानी झाली होती. वाहतुकीच्या रस्त्यालगतच हा ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी नेहमी चारचाकी व दुचाकी असतात.  बाजारहाट करणार्‍यांपैकी तसेच त्या परिसरातील कार्यालयांमधील ये – जा करणार्‍यांपैकी अनेक जण तिथून वावरत असतात. यामुळे हे स्पार्किंग दिवसा घडले असते तर मोठा अनर्थ घडला असता. यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडीत होवून अंधाराचे साम्राज्य पसरले होते.
याबाबत प्रत्यक्षदर्शीनी सांगितले की, तिथून जवळच उभी असलेली कार पेटून अथवा ट्रांसफार्मर पेटून मोठ्ठा स्फोट झाला असता तर भली मोठी आग लागण्याचा अनर्थ ओढवण्याची शक्यता होती.  परंतु सुदैवाने असा कोणताही अनर्थ घडलेला नाही.
दरम्यान, महावितरणच्या अधिकार्‍यांनी आणि कर्मचार्‍यांनी वेळीच दखल घेऊन तातडीने दुरुस्त्या करीत अत्यंत तत्परतेने त्या परिसरातील वीज पुरवठा सुरळीत करून दिला. अतिरिक्त कार्यकारी अभियंता मनीषा कोठारी यांनी याविषयी सांगितले की ट्रांसफार्मरला कोणताही धक्का बसलेला नाही . पाऊस पडल्यामुळे अशा घटना घडत असतात. एल टी वायर स्पार्किंग होऊन जळून खाक झाली आहे.  त्या व्यतिरिक्त कोणतीही नुकसान नसून वीज पुरवठा पूर्ववत सुरू केला आहे, असेही मनिषा कोठारी यांनी सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे ११ हजार ५२ परीक्षार्थी रविवारी देणार टीईटी परीक्षा

Next Post

बनावट दिव्यांग अंधत्व प्रमाणपत्र सादर करून शासकीय नोकरिस लागलेल्यावर कडक कारवाई करा : कन्हैय्यालाल ढोडरे यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

June 16, 2026
नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

June 16, 2026
श्रीमती क.पु. पाटील  विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add