Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

लाखापूर(फॉ.) येते कुकुट पालन केंद्रावर अस्वलाचा हल्ला

team by team
November 19, 2021
in क्राईम
0
लाखापूर(फॉ.) येते कुकुट पालन केंद्रावर अस्वलाचा हल्ला

तळोदा l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यात बोरद परिसरात असणाऱ्या लाखापूर (फॉ.) येथे गावालगत असलेल्या कुकुट पालन केंद्रावर अस्वलाने हल्ला केला यात सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही.
लाखापूर(फॉ.)येथील पंचायत समिती सदस्य चंदर दिवाकर पवार यांच्या मालकीचे असलेले कुकुट पालन केंद्र आहे. हे त्यांच्या मालकीच्या असलेल्या शेतजमिनीवर गावालगत असल्याने या ठिकाणी लोकांची वर्दळ नेहमी असते.त्याच बरोबर या ठिकाणी काही कामगारही आहेत. हे कामगार नियमित स्वरूपाचे आपले काम करीत असताना त्यांना दुपारी ठीक २ वाजता केंद्राच्या भोवती असलेल्या तारेच्या कुंपणावर अचानक लक्ष गेले असता भले मोठे अस्वल दिसून आले. हे अस्वल कुंपणाच्या तारा तोडण्याचा प्रयत्न करत होते हे पाहून त्यांनी ओरड करण्यास सुरवात केली असता गावातील लोक धावून आले.ते ही त्या महाकाय अस्वलाला बघून हादरून गेले तशाही परिस्थिती त दगडाच्या माध्यमातून त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला परंतु तरीही ते अस्वल जागेचे हलले नाही. तेव्हा गावातील काही लोक लाठ्या घेऊन धावले.लोकांची गर्दी पाहून आणि त्यांच्या जवळ असलेल्या लाठ्या पाहून ते सौरावैरा धावू लागले तेव्हा लोकांचीही एकच तारांबळ उडाली
सुदैवाने कुणालाही इजा पोहचली नाही. याबाबत नियमित गावात संपर्कात असलेले बोरद चे पत्रकार मंगेश पाटील यांनी तळोदा येथील आर.एफ.ओ. निलेश रोढे यांच्या शी संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली.त्याचबरोबर मेवासी वनविभाग कार्यालयातील कर्मचारी त्या ठिकाणी पाठविण्यात आले.
आजपर्यंत या परिसरात अस्वल आढळले नव्हते.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .शेतकऱ्यांचे ऊस तोडणी,त्याचबरोबर ज्वारी कापणी, कापूस वेचणी अशी कामे चालू आहेत तर काही ऊसतोड कामगार या परिस्थितीत वास्तव्यात आहेत.त्यामुळे वनविभागाने या घटनेची तात्काळ दखल घेऊन पिंजरा ठेवावा अशी मागणी घटनेच्या ठिकाणी उपस्थितांकरवी करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

भारतीय किसान सेनेने हमाल बांधवांना पेढे भरवून केला जल्लोष

Next Post

नवापूर तालुक्यातील खोकसा शिवारात अवकाळी पावसामुळे भात पिकाचे नुकसान

Next Post
नवापूर तालुक्यातील खोकसा शिवारात अवकाळी पावसामुळे भात पिकाचे नुकसान

नवापूर तालुक्यातील खोकसा शिवारात अवकाळी पावसामुळे भात पिकाचे नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add