नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात आज अवकाळी पाऊस बरसला, नंदुरबारसह नवापूर तालुक्यात पावसाचा जोर अधिक असल्याने भात, कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज दि.१९ नोव्हेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाचा काही भागात झोडपले. नवापूर तालुक्यात पावसाचा जोर अधिक असल्याने कापणी केलेल्या भात पिकाचे नुकसान होण्याची भीती शेतकर्यांकडून व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाने पुढील आणखी दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळे पावसाचा जोर वाढल्यास भात, कापूस पिकांसह फळबागांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान नंदुरबार तालुक्यात पावसाचा जोर असल्याने कापुस सह दुसर्या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.
नंदुरबार जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात कमी पर्जन्यमानामुळे नगदी पिकांसह इतर पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकर्यांच्या चिंतेत वाढ झाली असतांना आज सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे आणखी भर पडणार असून नुकसानग्रस्त शेतकर्यांकडे शासनाने वेळीच लक्ष देऊन भरपाई देण्याची अपेक्षा शेतकर्यांकडून व्यक्त केली जात आहे.