मालट्रकमधुन सरकी ढेपचे पोते चोरी केल्याप्रकरणी चौघांविरूध्द गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
नवापूर तालुक्यातील अंटीपाडा येथील स्वरूप दशरथ गावीत हे मालट्रकमध्ये (क्र.एम.एच.३९-सी. ०६७५) सुरत येथून सरकी ढेपचा माल घेवून येत होते. धुळे- सुरत महामार्गावरील चिंचपाडा रेल्वे गेटजवळ ट्रक थांबविला असता या मालट्रकच्या मागील बाजुस चढून सरकी ढेपचे चार पोते सात हजार रूपये किंमतीचे चोरीला गेले याबाबत स्वरूप दशरथ गावीत यांनी नवापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भानुदास मनु वसावे, क्षितीज सुरश नाईक, आनंदा इंदुलाल वसावे, अर्जुन प्रताप वसावे सर्व रा.चिंचपाडा या चौघांविरूध्द गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास असई बळवंत वळवी करीत आहेत.








