नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा-दोंडाईचा रस्त्यावर विष मिसळलेले पिठाचे गोळे खाल्ल्याने चार हजार रुपये किंमतीच्या दोन वराहांचा मृत्यू झाल्याप्रकरणी संशयिताविरोधात शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा -दोंडाईचा रस्त्यावरील रमाकांत पाटील यांच्या शेतात हरभरा पिकाचे डुकरांपासून संरक्षणासाठी पिठाच्या गोळ्यात विष मिसळले. हे विषारी पिठाचे गोळे खाल्ल्याने ४ हजार रुपये किंमतीच्या दोन वराहांचा मृत्यू झाला. याबाबत वराह पालक कृष्णा सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात संशयित चेतन पाटील याच्याविरोधात भादंवि कलम ४२९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.कोळी करीत आहेत.








