नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा पोलीस शिपाई भरती -2019 मध्ये 25 पदांसाठी पोलीस शिपाई भरती प्रक्रिया दरम्यान झालेल्या लेखी परिक्षेची आदर्श उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आली असून प्रश्नपत्रिकेमध्ये छपाई दरम्यान आक्षेप असल्यामुळे 1 प्रश्न रद्द करण्यात येत असून परिक्षेत्र उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांना सदरहू बाद केलेल्या 1 प्रश्नाचा 1 गुण देण्यात येत आहे .
नंदुरबार जिल्हा पोलीस शिपाई भरती -2019 मध्ये 25 पदांसाठी पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सुरु आहे . त्यानुसार दि . 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.00 ते 12.30 दरम्यान नंदूरबार शहरातील 11 परिक्षा केंद्रावर 100 गुणांची बहुपर्यायी लेखी परिक्षा घेण्यात आलेली आहे . सदरहू लेखी परिक्षेची आदर्श उत्तर तालिका ( Modal Answer Key ) संच निहाय ( A / B / C / D ) दि . 14 नोव्हेंबर रोजी प्रसिध्द करण्यात आलेली असून त्याबाबतच्या उमेदवारांच्या काही तक्रारी हरकत असल्यास दि .17.नोव्हेंबर रोजी 20.00 वाजेपर्यंत नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे अधिकृत ई – मेल आय .डी .sp.nandurbar@mahapolice.gov.in/www.nandurbarpolice.org किंवा हेल्पलाईन नंबर 9405626982 वर अथवा या कार्यालयात समक्ष मागविण्यात आल्या होत्या . त्यानुसार काही उमेदवारांकडून प्राप्त तक्रारी, हरकती अनुषंगाने पडताळणी केली असता , प्रश्नपत्रिका संच निहाय A , B , C , D मधील खालील नमुद 1 प्रश्न असलेल्या उत्तरासाठी प्रश्नपत्रिकेमध्ये छपाई दरम्यान आक्षेप असल्यामुळे 1 प्रश्न रद्द करण्यात येत असून परिक्षेत्र उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांना सदरहू बाद केलेल्या 1 प्रश्नाचा 1 गुण देण्यात येत आहे .
यात प्रश्न पत्रिका संच A मधील प्रश्न क्रमांक ३७, B मधील प्रश्न क्रमांक १२ , C मधील प्रश्न क्रमांक ८७ , D मधील प्रश्न क्रमांक ६३ हे प्रश्न रद्द ठरवण्यात आले आहे. त्या अनुषंगाने , नंदुरबार जिल्हा पोलीस शिपाई 2019 लेखी परिक्षेसाठी उपस्थित असलेल्या 2132 सुधारीत उमेदवारांची गुणपत्रिका www.nandurbarpolice.org प्रसिध्द करण्यात आलेली आहे . अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी प्रसिद्ध पत्रकान्वये दिली.








