नंदुरबार l प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीची प्रदेशकार्य समितीची बैठक मुंबई येथील वसंत स्मृती सभागृह येथे संपन्न झाली. या प्रदेश कार्यसमितीत भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केलेल्या कार्याचा कार्य अहवाल पुस्तिका प्रकाशन तसेच केंद्रीय मंत्री डॉ.सौ.भारतीताई पवार यांच्या जन आशीर्वाद यात्रा निमित्त नंदुरबार जिल्हा येथे आगमन त्यांचे स्वागत व विविध कार्यक्रमाची पुस्तिका प्रकाशन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधीपक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष खा.विनय सहस्त्रबुद्धे, राष्ट्रीय सचिव सि.टी. रवी, प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ.सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, आ.राजेश पाडवी उपस्थीत होते.









