नंदुरबार l प्रतिनिधी
भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांचेकडून प्राप्त हवामान अंदाजानुसार, अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे जिल्ह्यात दि. १८ ते २० नोव्हेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता आहे. दरम्यान हवामान ढगाळ राहील. शेतकरी बांधवानी पावसाची शक्यता असल्याने पक्वता अवस्थेत असलेल्या सोयाबीन, मका, इत्यादी खरीप पिकांचीकाढणी व मळणी करून व भाजीपालापिकांचीकाढणी करूनआणि कापूस पिकाची वेचणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावे. पथारीवर वाळत ठेवलेल्या मिरच्या सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात. वेळेवर पेरणी केलेल्या रबी पिकात ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आंतरमशागतीची कामे करून घ्यावीत. पुरेश्या ओलाव्यावर रबी पिकांची पेरणी पूर्ण करून घ्यावी. असे आवाहन जिल्हा कृषि हवामान केंद्र, डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार यांनी केले आहे.








