तळोदा l प्रतिनिधी
तळोदा शहरातील भुरट्या चोऱ्यांबरोबरच आता चोरट्यांची हिंमत वाढत चालली असुन त्यांची व्यापाऱ्यांवर प्राणघातक हल्ल्या पर्यंत गेली आहे.त्यांना पोलिसांच्या धाकच उरला नसल्याचे कालचा दरोड्याचा घटनेवरून स्पष्ट होते.त्यामुळे संतप्त व्यापाऱ्यांनी तळोदा महसूल अन् पोलिस प्रशासनास मंगळवारी साकडे घालून दरोडेखोरांचा तातडीने शोध घेवून गेल्या अनेक वर्षापासून बंद पडलेले सीसीटिव्ही कॅमेरे कार्यान्वित करावेत अशी मागणी केली आहे.या बाबत आठ दिवसांच्या आत कार्यवाही व्हावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.दरम्यान तळोदा शहरातील वाढत्या चोऱ्यांच्या प्रकरणी व्यापाऱ्यांनी प्रशासनास चांगलेच धारेवर धरले होते.या प्रकरणी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन व्यापाऱ्यांना देण्यात आले.
तळोदा शहरात अलीकडे घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे.अगदी दिवसा ढवळ्या दुकानातून ग्राहकांचं दागिने,इलेक्ट्रिक वस्तू मारण्याचे प्रकार वाढले आहेत.साहजिकच चोरट्यांना पोलिसांचा धाकच राहिला नसल्यामुळे चोरट्यांची मजल वाढली आहे.सोमवारी तर एका व्यापाऱ्याला गावठी कट्टा (पिस्तुल) लावून लुटण्याचा प्रयत्न झाला होता.तथापि व्यापाऱ्यांचा संघर्षामुळे दरोड्याचा प्रयत्न अयशस्वी झाला.मात्र आता चोरीसाठी चोरट्यांकडून व्यापाऱ्यांवर प्राणघातक हल्ले होत असल्याने प्रचंड भीती पसरली आहे.चोरट्यांचा ठोस बंदोबस्त केला जात नसल्याने संतप्त व्यापाऱ्यांनी मंगळवारी महसूल अधिकारी शैलेश गवते व पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक केलसींग पावरा यांनाच साकडे घातले.यावेळी व्यापाऱ्यांनी शहरातील भुरट्या चोऱ्या व चोरट्यांचा प्राणघातक हल्ल्या बाबत तीव्र संताप व्यक्त करून हल्लेखोर चोरट्यांच्या ताबडतोब बंदोबस्त करावा.शिवाय रात्रीची गस्त वाढवावी.त्याचबरोबर तळोदा शहरात ठिकठिकाणी जे सीसीटिव्ही कॅमेरे लावले आहेत.ते अनेक वर्षापासून बंद पडलेले आहेत.हे कॅमेरे केवळ शोभेचा वस्तू म्हणून ठरले आहेत.उदासीन वरिष्ठ पोलीस प्रशासनाने देखील त्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे.या बंद कॅमेऱ्यामुळे चोऱ्यांच्या तपासला कशी गती येईल असा सवाल देखील व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे.येत्या आठ दिवसांच्या आत हेल्लेखोर चोरट्यांचा बंदोबस्त होवून सीसीटिव्ही कॅमेरे,रात्रीची वाढीव गस्त यावर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा तळोदा व्यापारी महासंघाचा वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा अध्यक्ष व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आनंद सोनार, नगरसेवक गौरव वाणी, गौतम जैन,सुभाष जैन,प्रसाद सोनार,बाबाभाई शहा,प्रवीण जैन,धनराज पारेख,श्याम राजपूत, संजय वाणी,चेतन शहा,शिरीष माळी,प्रकाश कोचर,प्रकाश कलाल,धनराज जैन,प्रकाश पाटील, हंसकुमार जैन,मुकेश जैन,मुकेश वाणी,हातीम बोहरी,शब्बीर बोहरी, गबा अहिरे.आदीसह शेकडो व्यापारी उपस्थित होते.








