नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथे एकलव्य आदिवासी क्रांतीदल संघटनेतर्फे क्रांतिसुर्य भगवान बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमात संघटनेचे मार्गदर्शक अमोल पगारे यांनी थोडक्यात जननायक बिरसा मुंडा यांचा इतिहास लोकांसमोर मांडला व एकलव्य आदिवासी क्रांतीदल संघटनेला आवाहन केले की,येणाऱ्या काळात संघटनेच्या माध्यमातून गावोगावी जनजागृती करा व नंदुरबार येथे क्रांतिसुर्य भगवान बिरसा मुंडा यांचे स्मारक उभारण्यात यावे. जेणे करून याची प्रशासन दखल घेईल असे कार्य संघटने मार्फत करा.असे असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी कार्यक्रमात भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले .कार्यक्रमाला उद्योजक किरण तडवी रावसाहेब, उपनगराध्यक रविंद्र पवार, उपसभापती,प.स कमलेश महाले,नगरसेवक कुणाल. वसावे, यशवर्धन रघुवंशी, उपनगरचे पी.आय यादव भदाणे, प्रविण पाटील, ए.पी. आय.नरेंद्र भदाणे,मा.जि.प.सदस्य अमोल भारती, मा.पंचायत स.सदस्य दिपक मराठे, चेतन वळवी,राष्ट्रवादीचे युवा नेते राऊ मोरे, भीम आर्मी जिल्हाध्यक्ष संजू रगडे,युवा सेना जिल्हा प्रमुख अर्जुन मराठे, व्यापारी विजू मतानी, मोहन खाणवानी, युवक शहर अध्यक्ष,राष्ट्रवादी लल्ला मराठे, दुधाळे सरपंच सत्यपाल मालचे तसेच संघटनेचे नंदुरबार व शहादा येथील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








