नंदुरबार l प्रतिनिधी
जित कुने डो आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या तळोदा महाविद्यालयातील व बिरसा मुंडा स्पोर्ट्स अकॅडमीच्या विद्यार्थ्याचा बिरसा मुंडा जयंतीनिमित्त सत्कार करण्यात आला.

तळोदा येथील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय येथील व बिरसा मुंडा स्पोर्ट्स अकॅडमीचे विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली.यात तुळशीदास रोहिदास पाडवी, प्रवीण कृष्णा वळवी व आतिष प्रभातसिंग पाडवी यांचा बिरसा मुंडा जयंतीनिमित्त बिरसा मुंडा स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच राष्ट्रीय स्तरावर सहभाग नोंदवण्याऱ्या आशिष पाडवी,गिरीष पाडवी, युवराज कोठारी, व राष्ट्रीय पंच परीक्षेत यश मिळवणार अजय वळवी व अनमोल पाडवी यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली. भगवान बिरसा मुंडा व आदिवासी कुलदेवता याहा मोगीचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी तरुण वयात त्याची समवयस्क आणि समविचारी सहकार्याचे संघटन केले, तर आपण पण सघटीत व आपली संस्कृती टिकवली पाहिजे असे रामसिंग पाडवी यांनी सांगितले. कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका जेर्मीताई पाडवी, संगीता पाडवी, जेष्ठ नागरिक विलास वसावे, रवींद्र पाडवी उपस्थित होते. या ठिकाणी गावातील अमिता नाईक, व आशा पाडवी,पूनम पाडवी, मंजू पाडवी, महेश वळवी,जम्प रोप सहसचिव गुणवंत पाडवी यांच्या हस्ते योगा,मल्लखांब,रोप मल्लखांब जित-कुने डो, जम्प रोप करणाऱ्या देविका, कल्याणी, जास्मिन, पौर्णिमा, प्रशांत, नम्रता, रचना, साहिल,सुवर्णा,पियुष यांचाही सत्कार करून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्यात.








