Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांच्या संपास कुणबी पाटील युवा मंचचा जाहीर पाठींबा

team by team
November 13, 2021
in सामाजिक
0
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांच्या संपास कुणबी पाटील युवा मंचचा जाहीर पाठींबा

नंदुरबार l प्रतिनिधि

महाराष्ट्र शासनाव्दारे राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचारी यांचे शासकीय सेवेत विलीगीकरण करून घेण्याबाबत सुरू असलेल्या कर्मचार्‍यांच्या संपाला कुणबी पाटील युवा मंच , नंदुरबार जिल्ह्या व आशापुरी फाऊंडेशनतर्फे पाठींबा देण्यात आला.
यावेळी निवेदनात म्हटले आहे कि, कुणबी पाटील युवा मंच नंदुरबार जिल्हा यांच्यावतीने आम्ही राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांच्या सुरू असलेल्या संपास जाहीर पाठींबा देत आहोत . एस.टी.महामंडळातील सर्व कर्मचार्‍यांना शासनाने शासकीय सेवेत विलीगीकरण करून घ्यावे . तसेच वर्षानुवर्षे दिवस रात्र सेवा बजावणार्‍या या सर्व कर्मचार्‍यांना इतर सर्व राज्य शासनाच्या कर्मचार्‍यांप्रमाणेच वेतन व त्या संबंधीतील सर्व सोयीसुविधा शासनाने त्वरीत लागू कराव्यात . यासाठी कुणबी पाटील युवा मंच , नंदुरबार वतीने शासनास विनंती करीत आहोत . कर्मचार्‍यांनी सुरू केलेल्या या संपाला जाहीर पाठींबा देखील देत आहोत . शासनाच्या वतीने सदर संपामुळे कर्मचान्यांवर अन्यायकारक कार्यवाही करू नये अशी विनंती शासनास करीत आहोत . तसेच हे कर्मचारी जे वर्षानुवर्षे कमी पगारावर काम करीत असून आता तरी या कर्मचार्‍यांचा व त्यांच्या परिवाराचा विचार या सरकारने करावा . आणि या संपात मृत्युमुखी झालेल्या कर्मचार्‍यांच्या परिवारावर आलेले संकट दूर करून त्यांनाही योग्य तो न्याय द्यावा . पुनश्च एकदा कुणबी पाटील युवा मंच , नंदुरबार जिल्हा वतीने या संपाला जाहीर पाठींबा देत असून शासनाने यावर त्वरीत निर्णय घेऊन कर्मचार्‍यांना व संपामुळे जनतेस देखील फार काळ वेठीस धरू नये म्हणून सदरच्या मागण्या मान्य करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली. यावेळी दिनेश पाटील, प्रदीप देसले , रविंद्र पाटील, किशोर पाटील, हिरामण पाटील, दिग्विजय पाटील, नितिन सनेर, निलेश पाटील, ललित सुर्यवंशी, हे  पदाधिकारी  उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी पोलीस दलातर्फे तगडा बंदोबस्त, प्रत्येक परीक्षा केंद्रावर २ भरारी पथकांसह होणार व्हिडीओ शुटींग

Next Post

प्रकाशा येथील कार्तिक स्वामींचा यात्रोत्सव यावर्षीही रद्द,यावेळी घेता येणार दर्शन

Next Post
प्रकाशा येथील कार्तिक स्वामींचा यात्रोत्सव यावर्षीही रद्द,यावेळी घेता येणार दर्शन

प्रकाशा येथील कार्तिक स्वामींचा यात्रोत्सव यावर्षीही रद्द,यावेळी घेता येणार दर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add