Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध अभियानाअंतर्गत अधिक क्षयरुग्ण आढळलेल्या गावातील प्रत्येक घरात होणार आरोग्य तपासणी

team by team
November 12, 2021
in आरोग्य
0
प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध अभियानाअंतर्गत अधिक क्षयरुग्ण आढळलेल्या गावातील प्रत्येक घरात होणार आरोग्य तपासणी

प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध अभियानाअंतर्गत एकुण  ३ लाख २१ हजार ३५९ इतक्या लोकसंख्येतील ६४ हजार २७२ घरांपर्यंत १६१ पथके पोचणार असून गेल्या पाच वर्षात अधिक क्षयरुग्ण आढळलेल्या गावातील प्रत्येक घरात आरोग्य तपासणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले
प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध अभियानासाठी जिल्हास्तरीय समन्वय समिती गठित करण्यात आली असून सदर समितीची सभा दि. २९ रोजी  जिल्हाधिकारी मनीषा खत्री  यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे संपन्न झाली.
यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी जनतेस आवाहन केले कि , पूर्ण उपचार घेतल्यास क्षयरोग पूर्णपणे बरा होतो तरी क्षयरोगाची लक्षणे आढळल्यास ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी. क्षयरोगाची तपासणी व उपचार पूर्णपणे मोफत आहेत, त्यांचा लाभ घ्यावा.तसेच  गेल्या पाच वर्षात अधिक क्षयरुग्ण आढळलेल्या गावातील प्रत्येक घरात आरोग्य तपासणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले व अभियान यशस्वी होणेसाठी मार्गदर्शन केले.
या अभियाना अंतर्गत जिल्हयातील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आशा कार्यकर्त्या व स्वयंसेवक यांच्याद्वारे  प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध अभियानाअंतर्गत एकुण  ३ लाख २१ हजार ३५९ इतक्या लोकसंख्येतील ६४ हजार २७२ घरांपर्यंत १६१ पथके पोचणार असून घरोघरी भेट देऊन क्षयरोगाच्या लक्षणांची माहिती देणे व तसेच संशयित क्षयरुग्ण आढळल्यास त्यांची थुंकी नमुने घेऊन जवळच्या सुक्ष्मदर्शक केंद्रात तपासणी करीता देऊन आवश्यकतेनुसार एक्स रे तपासणी व सिबीनॅट मशिनव्दारे तपासणी करण्यांत येणार आहे. जिल्हयातील निवड केलेल्या अतिजोखमीच्या भागात ही मोहिम राबवुन रुग्ण शोधले जाणार आहेत. या मोहिमेत आढळलेल्या रुग्णांना त्वरीत उपचार देण्यात येणार आहे.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार, जिल्हा कार्यक्रम समन्वयक शिरीष भोजगुडे, डी.पी.एस राहुल वळवी, पी.पी.एम. समन्वयक समुवेल मावची, डिइओ रामचंद्र बारी आदी  उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

पुन्हा घरफोडी : नंदुरबार येथील जगतापवाडी जवळ घरफोडीत २ लाखाचा ऐवज लंपास

Next Post

मंगळ बाजारात भाजीपाला घेणार्‍या महिलेच्या गळ्यातून पावणेदोन लाखाचे मंगळसूत्र लंपास

Next Post
मंगळ बाजारात भाजीपाला घेणार्‍या महिलेच्या गळ्यातून पावणेदोन लाखाचे मंगळसूत्र लंपास

मंगळ बाजारात भाजीपाला घेणार्‍या महिलेच्या गळ्यातून पावणेदोन लाखाचे मंगळसूत्र लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

July 2, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

July 2, 2026
कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

July 2, 2026
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add