Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खाजगी ट्रॅव्हल्स चालकांकडुन प्रवाश्यांची आर्थिक लुट थांबवावी, नंदुरबार जिल्हा मनसेची मागणी

team by team
November 12, 2021
in राजकीय
0
खाजगी ट्रॅव्हल्स चालकांकडुन प्रवाश्यांची आर्थिक लुट थांबवावी, नंदुरबार जिल्हा मनसेची मागणी

नंदुरबार l प्रतिनिधी

राज्यातील एसटी कर्मचार्‍यांनी चार दिवसांपासुन बेमुदत संप पुकारला आहे. या संपाचा फायदा घेत नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील खाजगी वाहतुक व ट्रॅव्हल्स चालक हे प्रवाश्यांकडुन अव्वाच्या सव्वापटीने प्रवासभाडे घेवुन लुट करीत आहेत. उपप्रादेशिक परिवहन विभागाने निश्चित केलेल्या प्रवास दराऐवजी मनमानीपणे प्रवासभाडे आकारीत आहेत. म्हणुन खाजगी ट्रॅव्हल्स चालकांवर योग्य कारवाई करुन प्रवाश्यांची लुट थांबवावी, अशी मागणी नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी व पदाधिकार्‍यांनी केली आहे.

याबाबत नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बीडकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, गेल्या चार दिवसांपासुन राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपाची झळ सर्वसामान्य प्रवाश्यांना सोसावी लागत आहे. या संधीच्या फायदा घेऊन नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील खाजगी वाहतुक आणि ट्रॅव्हल्स चालकांकडुन चार ते पाच पटीने प्रवासभाडे जास्तीच्या रक्कम स्वरुपात घेवुन अक्षरशः प्रवाश्यांची आर्थिक लुट सुरु आहे. नंदुरबार ते नाशिक दरम्यानचे प्रवासभाडे प्रतिव्यक्ती तब्बल 1600 रुपये आकारुन कहर केला असुन सदर जास्तीचे प्रवासभाडेचे तिकीट देखील प्रसारीत झाले आहे. आपल्या नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन विभागाकडुन काही दिवसांपुर्वी खाजगी ट्रॅव्हल्सचे प्रवास भाडेदर निश्चित करुन दिले आहे. असे असतांना देखील संबंधित ट्रॅव्हल्स चालक आपण निश्चित केलेल्या प्रवासीभाडे दराव्यक्ती व्यतिरिक्त प्रवाश्यांकडुन अव्वासव्वापटीने जास्तीचे प्रवासभाडे आकारीत आहेत. म्हणुन उपप्रादेशिक परिवहन विभागाने तात्काळ दखल घेऊन प्रवाश्यांची आर्थिक लुट करणार्‍या खाजगी ट्रॅॅव्हल्स चालकांवर कठोर कारवाई करावी. तसेच खाजगी ट्रॅव्हल्स चालकांवर नियंत्रण ठेवुन योग्य ते प्रवासभाडे आकारण्यात यावे, यातून प्रवाशांना दिलासा मिळेल. म्हणुन आरटीओ विभागाने खाजगी ट्रॅव्हल्स आणि लक्झरी बस यांच्यावर करडी नजर ठेवुन ट्रॅव्हल्स चालकांवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी मनसेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, जिल्हा सचिव पवनकुमार गवळे, नंदुरबार तालुकाध्यक्ष राकेश माळी, नंदुरबार विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुनिल कोकणी, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रविण जोशी, मनविसेचे सैनिक राम ठक्कर, खोंडामळीचे गटअध्यक्ष कल्पेश माळी आदींनी निवेदनातुन केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

काँग्रेस सेवादलाच्या नंदुरबार शहराध्यक्षपदी प्रविण लोहार यांची नियुक्ती

Next Post

पुन्हा घरफोडी : नंदुरबार येथील जगतापवाडी जवळ घरफोडीत २ लाखाचा ऐवज लंपास

Next Post
नंदुरबार येथे घरफोडीत  ६ लाख ७२ हजाराचा ऐवज लंपास

पुन्हा घरफोडी : नंदुरबार येथील जगतापवाडी जवळ घरफोडीत २ लाखाचा ऐवज लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add