Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर पं.स.च्या प्रशासकीय इमारत बांधकामासाठी पाच कोटी मंजुर, आ.शिरिषकुमार नाईक यांच्या पाठ पुराव्याला आले यश

team by team
November 12, 2021
in राजकीय
0
नवापूर पं.स.च्या प्रशासकीय इमारत बांधकामासाठी पाच कोटी मंजुर, आ.शिरिषकुमार नाईक यांच्या पाठ पुराव्याला आले यश

नवापूर l प्रतिनिधी

येथील पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारत बांधकामासाठी सुमारे पाच कोटी इतक्या सुधारित अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आ.शिरिषकुमार नाईक यांच्या सततच्या पाठ पुराव्यामुळे निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नवापूर पंचायत समितीची इमारत जूनी झाल्याने नव्याने प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. शासनाने पंचायत समिती इमारत बांधकामासाठी  ४ कोटी २७ लाख ७९ हजार इतक्या अंदाजपत्रकीय किंमतीच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली होती.  मात्र  २०१७-१८ चे प्रचलित दरसूचीनुसार अंदाजपत्रक तयार करण्यात आले असल्याने व सन २०१९-२० ची दर सूची लागु झाल्यामुळे दरांमध्ये वाढ झाल्याने, प्रस्तुत नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम ४ कोटी २७ लाख ७९ हजारात करता येणे शक्य नव्हते. आ.शिरिषकुमार नाईक यांनी नवीन प्रशासकीय इमारत बांधकामासाठी आवश्यक वाढीव ६३ लाख ९३ हजाराची आवश्यकता लक्षात घेता तसा प्रस्ताव तयार केला. नवापूर पंचायत समितीची अद्यावत इमारत तयार व्हावी यासाठी आ. शिरिष कुमार नाईक यांनी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. तसा प्रस्ताव सादर केला, वाढीव निधि साठी सतत पाठपुरावा केला. त्याअनुषंगाने पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारत बांधकामास सुधारीत अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आ. शिरिषकुमार नाईक यांनी सांगितल्या प्रमाणे प्रस्ताव सादर केला.
शासनाने नवीन प्रशासकीय इमारत बांधकामासाठी आवश्यक वाढीव रक्कम ६३ लाख ९३ हजार मंजुरी देऊन नवीन प्रशासकीय इमारत बांधकामासाठी  ४ कोटी ९१लाख ७२ हजार  इतक्या अंदाजपत्रकास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
नवापूर पंचायत समितीच्या नविन प्रशासकीय इमारतीचा मार्ग मोकळा झाला आहे. या इमारतीमुळे सर्व प्रशासकीय विभाग एकाच छत्रछायेखाली येतील.

बातमी शेअर करा
Previous Post

पोस्टात विनाअट भरणा करण्याच्या मागणीसाठी अल्पबचत महिला एजंटांचे खा.डॉ.हिना गावीतांना निवेदन

Next Post

काँग्रेस सेवादलाच्या नंदुरबार शहराध्यक्षपदी प्रविण लोहार यांची नियुक्ती

Next Post
काँग्रेस सेवादलाच्या नंदुरबार शहराध्यक्षपदी प्रविण लोहार यांची नियुक्ती

काँग्रेस सेवादलाच्या नंदुरबार शहराध्यक्षपदी प्रविण लोहार यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

July 2, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

July 2, 2026
कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

July 2, 2026
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add