Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रोहयोच्या कामाचे मस्टर काढण्यासाठी पाचशे रुपयांची लाच घेणाऱ्या पंचायत समितीच्या तांत्रिक सहाय्यक अधिकार्‍यास अटक

team by team
November 11, 2021
in क्राईम
0
रोहयोच्या कामाचे मस्टर काढण्यासाठी पाचशे रुपयांची लाच घेणाऱ्या पंचायत समितीच्या तांत्रिक सहाय्यक अधिकार्‍यास अटक

नंदुरबार | प्रतिनिधी-
रोजगार हमी योजनेंतर्गत शेतात वृक्ष लागवड करण्यासाठी मजूरांचे मस्टर तयार करुन त्याचे बिल काढून देण्यासाठी ५०० रुपयांची लाच स्विकारणार्‍या अक्कलकुवा पंचायत समितीच्या तांत्रिक सहाय्यक अधिकारी अभिषेक गोपिचंद नुक्ते याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार हे शेतकरी असून त्यांनी पंचायत समिती अक्कलकुवा येथे त्यांच्या आईच्या नावे एक एकर शेती आहे. त्या शेतात रोजगार हमी योजनेंतर्गत वृक्ष लागवड करण्याकामी पंचायत समिती अक्कलकुवा येथे ऑक्टेबर २०२१ मध्ये अर्ज केला होता. सदर योजना ही तीन वर्षे मुदतीची असून तीन वर्षात अंदाजे ४० हजार रुपये मिळणार आहे. त्या वृक्ष लागवडीस लागलेला मजूरांच्या खर्चाचे मस्टर बील अक्क्लकुवा पंचायत समितीचे तांत्रिक सहायक अधिकारी (रो.ह.यो.) अभिषेक गोपीचंद नुक्ते यांनी तयार करुन तक्रारदारांना पहिला हप्ता २ हजार ९७६ रुपये मजुरांच्या खात्यांवर टाकुन दिला होता. सदर बिल काढून दिल्याच्या मोबदल्यात नुक्ते हे तकारदारांकडे ५०० रुपये लाचेची मागणी केलेली होती. सदर रक्कम आज दि.१० नोव्हेंबर २०२१ रोजी पंच व साक्षीदारांसमक्ष पंचायत समितीच्या रेकॉर्ड रुमजवळ स्विकारली असून त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
सदर कामगिरी पोलीस निरीक्षक समाधान वाघ, पोलीस निरीक्षक श्रीमती माधवी समाधान वाघ, पोहवा उत्तम महाजन, पोहवा विजय ठाकरे, पोहवा विलास पाटील, पोना मनोज अहिरे, पोना अमोल मराठे, पोना चित्ते, मपोना ज्योती पाटील, पोना नावाडेकर, चापोना महाले यांच्या पथकाने केली.

बातमी शेअर करा
Previous Post

काठीचा राऊतपाडा येथे दोन बालिकांचा पाण्यात बुडून मृत्यू

Next Post

तळोदा येथील खेळाडूंचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

Next Post
तळोदा येथील खेळाडूंचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

तळोदा येथील खेळाडूंचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

July 2, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

July 2, 2026
कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

July 2, 2026
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add