नंदुरबार l प्रतिनिधी
औरंगाबाद येथे सरपंच परिषदेत शिवसेनेचे आमदार
आमदार संजय शिरसाट यांनी ग्रामसेवकांबद्दल अपमानास्पद शब्द वापरल्याच्या निषेध म्हणून राज्य ग्रामसेवक युनियन आज दि.९ नोव्हेंबर रोजी काम बंद आंदोलन पुकारण्यात आला आहे.याबाबत प्रत्येक तालुक्यातील तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबाद येथे सरपंच परिषदेत शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी ग्रामसेवकांबद्दल अपमानास्पद शब्द वापरला. त्या अपमाना बद्दल ग्रामसेवक संघटनेमध्ये तीव्र नाराजी निर्माण झालेली आहे. याबाबत उद्या दि. ९ नोव्हेंबर रोजी राज्य ग्रामसेवक युनियनतर्फे एक दिवसाचा कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. आमदार संजय शिरसाट यांनी विनाअट माफी मागावी याकरिता राज्यभर आंदोलन छेडले जाणार आहे.त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत महाराष्ट्रातील सर्व राज्य ग्रामसेवक युनियन, पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष, सचिव,तालुकाध्यक्ष सचिव यांनी जाहीर निषेध करावा. असे संघटनेतर्फे आवाहन करण्यात आले आहे. या वक्तव्याचा निषेध म्हणून राज्यभर आंदोलन छेडले जाणार आहे. तसेच उद्या तालुका स्तरावर तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन निषेध करण्यात येणार असल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले आहे.
आमदार संजय शिरसाट यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करन्यात येणार आहे. जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांना निवेदन देण्यात येणार आहे. या वक्तव्याचा निषेध म्हणून राज्यातील 27 हजार 536 ग्रामपंचायतीचे कामकाज ग्रामसेवक बंद ठेवतील तसेच काळ्याफिती लावून लोकशाही मार्गाने निषेध नोंदवणार आहेत.
अशी माहिती एकनाथ ढाकणे, प्रशांत जामोदे, संजीव निकम आणि राज्य ग्रामसेवक युनियन पदाधिकारी मंडळ तर्फे देण्यात आली.








