Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तिनसमाळ येथे स्थानिक नागरिकांच्या मदतीने जोहार आदिवासी संग्रहालयाची निर्मिती

team by team
November 8, 2021
in सामाजिक
0
तिनसमाळ येथे स्थानिक नागरिकांच्या मदतीने जोहार आदिवासी संग्रहालयाची निर्मिती

धडगाव l प्रतिनिधी
सातपुड्यातील तिनसमाळ येथे स्थानिक नागरिकांच्या मदतीने जोहार आदिवासी संग्रहालयाची निर्मिती करण्यात आली.
सातपुडा पर्वत रांगेतील तीन राज्यांच्या सीमेवर असलेल्या तिनसमाळ येथे जोहार फाउंडेशनच्या माध्यमातून आदिवासी पारंपारिक वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या गावातील तरुण लक्ष्मण पावरा यांच्या पुढाकाराने स्थानिक नागरिकांच्या मदतीने आदिवासी संग्रहालयाची निर्मिती करण्यात आली आहे. आदिवासी साहित्य, संस्कृती पुढच्या पिढीसाठी ऐतिहासिक ठरावी या उद्देशाने या संग्रहालयाची निर्मिती करण्यात आली आहे. आदिवासी ढोल वाजवत जंगलात राहणाऱ्या आदिवासींचा पेहराव करून गावातून नाचत गाजत रॅली काढण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत आदिवासी परंपरेनुसार गिरहणमाता, याहा मोगी यांची विधीवत पूजा करून जोहार आदिवासी संग्रहालयाचा शुभारंभ करण्यात आला. प्रथम नाणी संग्रहालयाचे प्रदर्शन संदीप पावरा यांच्या हस्ते करण्यात आले. या संग्रहालयात विविध पारंपारिक आदिवासी साहित्यिक पुस्तके, वस्तू, भांडी, वनौषधी, व इतर माहिती संग्रहित केली जाणार आहे. या संग्रहालयाचा आणखी विकास व्हावा यासाठी ग्रामपंचायत स्तरावरून व महाराष्ट्र शासनाकडून मदत मिळावी जेणेकरून सातपुडा पर्वतरांगांनी वेढलेलं व नर्मदा नदीच्या काठावर असलेल्या ऐतिहासिक व थंड हवेचे ठिकाण म्हणून पर्यटनस्थळ असलेल्या तिनसमाळ गावाची जागतिक स्तरावर ओळख निर्माण व्हावी यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मान्यवरांनी सांगितले. नैसर्गिक संपदा लाभलेल्या तिनसमाळ गावकऱ्यांच्या माध्यमातून उभारलेल्या संग्रहालयाच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मोगरा बाबा, प्रमुख पाहुणे आदिवासी साहित्यिक वाहरू दादा सोनवणे, युवा कवी संतोष पावरा, इंजि. झेलसिंग पावरा, जिल्हा परिषद सदस्य सी. के. पाडवी, नामदेव पटले, सिताराम पावरा, पंचायत समिती उपसभापती भाईदास अत्रे, सुरेश मोरे, आदिवासी जनजागृतीचे प्रमुख अर्जुन पावरा , ॲड. कैलास वसावे आदी मान्यवरांसह गावकरी व पाहुणे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

सेवाभावे प्रतिष्ठानच्या सदस्यांनी चिमुकल्यांसोबत साजरी केली दिवाळी

Next Post

सफाई कामगारांचे सोमवारपासून उपोषण कुंदन थनवार यांनी दिले जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

Next Post
सफाई कामगारांचे सोमवारपासून उपोषण कुंदन थनवार यांनी दिले जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

सफाई कामगारांचे सोमवारपासून उपोषण कुंदन थनवार यांनी दिले जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add