Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा भोईसमाज पंच व नवयुवक मंडळातर्फे दिवाळी फराळ वाटप

team by team
November 6, 2021
in सामाजिक
0
तळोदा भोईसमाज पंच व नवयुवक मंडळातर्फे दिवाळी फराळ वाटप

तळोदा | प्रतिनिधी
तळोदा भोईसमाज पंच व नवयुवक मंडळ यांच्यातर्फे दिवाळी सणाचे औचित्य साधून आपुलकीच्या भावनेतून निराधार व गोरगरिबांना दिवाळी निमित्ताने ५५० कुटुंबांना फराळ व मिठाई वाटप करून दिवाळी साजरी करण्यात आली.

सर्वत्र दिवाळी साजरी होत असतांना समाजातील निराधार, गरीब कुटुंब मात्र या आनंदापासून दूर असतात. या वंचित घटकांतील व्यक्तींनाही दिवाळीचा आनंद घेता यावा त्यांचीही दिवाळी गोड व्हावी यासाठी तळोदा भोईसामज पंच नवयुवक मंडळ  यांचासाठी पुढे सरसावला आहेत. गोरगरीब बंधूंना झोपडीत, ऊस तोड मजूर वर्ग, उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना अशा ठिकठिकाणी गरजू कुटुंबांना दिवाळी फराळ व मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून  हृदयापासून आम्हलाही खूप आनंद वाटले या उपक्रमातून अनेकांची दिवाळी आनंदमय झाली.

भोईसमाज पंच व नवयुवक मंडळ तळोदा यांनी पुढाकार घेत तळोदा शहरात  गावात वाड्या-वस्त्यांवर आणि रस्त्याच्या कडेला झोपडी बनवून राहणाऱ्यांच्या घरात दिवाळीचा सण आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने दिवाळी साजरा होत नाही. त्यांच्या घरातही दिवाळी साजरी झाली पाहिजे त्यांच्या चेहऱ्यावर देखील आनंद दिसला पाहिजे. या उदात्त हेतूने भोईसमाज पंच व नवयुवक मंडळ तळोदा यांनी या दिवाळीला फराळ वाटपाचा उपक्रम राबविला आहे. आर्थिक परिस्थितीमुळे घरात रोजचे जेवणदेखील व्यवस्थित मिळत नाही. अशांच्या घरात दिवाळीच्या वेळेस गोड व चवदार अन्नपदार्थ कुठून येणार असा प्रश्न आमच्यासमोर होता. त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून गरीब, गरजू कुटुंबीयांना फराळ व साहित्य देऊन दिवाळीचा सणात त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचा एक छोटासा  प्रयत्न केला आहे.
यावेळी तळोदा भोईसमाज पंच व नवयुवक मंडळाचे जिल्हा अध्यक्ष संतोष वानखेडे, तालुका अध्यक्ष धनलाल शिवदे, प्रा.राजेंद्र मोरे, जगदीश वानखेडे, चंद्रकांत साठे, गणेश शिवदे, सचिव धनराज सोनवणे, चंद्रकांत भोई, प्रमोद भोई, गिरीश भोई, सचिन भोई, धीरज भोई आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

विसरवाडी सरपंच बकाराम गावित यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा 7 नोव्हेंबरला शिवसेनेत प्रवेश

Next Post

केवडीपाडा येथे दिवाळीच्या दिवशी लहान भावाने केला मोठया भावाचा खून,एकास अटक

Next Post
केवडीपाडा येथे दिवाळीच्या दिवशी लहान भावाने केला मोठया भावाचा खून,एकास अटक

केवडीपाडा येथे दिवाळीच्या दिवशी लहान भावाने केला मोठया भावाचा खून,एकास अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add