नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यासह जिल्ह्यात लसीकरणाचे टक्का वाढवण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.यात आपलाही सहभाग असावा यासाठी तळोदा येथील शिक्षकाने अस्तंबा यात्रेत सहभागी होत कोरोना लसीकरण जनजागृतीसाठी केली.
कोरोना अजुन गेलेला नाही ,त्यापासून पूर्ण बचावासाठी लसीकरण करून घेणे हा योग्य मार्ग आहे. शासकीय , सामाजिक तसेच वैयक्तिक पातळीवर त्यासाठी प्रयत्न होत आहेत.
तळोदा येथे राहणारे फुंदीलाल चुनीलाल माळी
हे मागील 23 वर्षांपासून कॉ.बी.टी.आर.हायस्कुल मोड ता.तळोदा येथे कार्यरत आहेत.दरवर्षी ते अस्तंबा यात्रेसाठी जात असतात यावर्षी 2021 ची ही त्यांची 29 वी यात्रा होती. मागील वर्षी कोरोनाच्या सावटाखाली देखील यात्रा पूर्ण केली होती.

नंदुरबार जिल्ह्यात लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी सारेच प्रयत्नशील आहेत. अस्तंबा यात्रेनिमित्त हजारो बांधव सातपुड्यात हजेरी लावत असतात. त्यांच्यात लसीकरणाची जनजागृती व्हावी असा विचार घेऊन शिक्षका सोबतच पत्रकार असलेले फुंदीलाल चुनीलाल माळी यांनी कोरोना लसीकरण जनजागृतीचे एक बॅनर बनवले.अस्तंबा यात्रेच्या वाटेतील माळ खुर्द ,नकट्यादेव ,जुना अस्तंबा ,अस्तंबा टेकडी ,देवनदी ,चांदसैली आदी ठिकाणी बॅनर झळकवत यात्रेकरूंना त्याकडे आकर्षित केले.अनेक बांधवांनी फोटो काढले ,वाचन केले व प्रशंसा केली. कोरोना लसीकरण जनजागृतीसाठी शिक्षकाने अस्तंबा शिखरावर जनजागृती केल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.








