Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रांझणी-रोझवा शिवारात ट्रान्सफार्मरवर शार्ट सर्किट झाल्याने बारा लाखाचा ऊस जळून खाक  

team by team
November 4, 2021
in कृषी
0
रांझणी-रोझवा शिवारात ट्रान्सफार्मरवर शार्ट सर्किट झाल्याने बारा लाखाचा ऊस जळून खाक  

तळोदा l प्रतिनिधी

तळोदा तालुक्यातील रांझणी-रोझवा शिवारात विद्युत ट्रान्सफार्मरवर शार्ट सर्किट झाल्याने तोडणीस आलेल्या बारा ऐकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली. या शेतकऱ्यांचे सुमारे दहा ते बारा लाखाचे नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की, रांझणी-रोझवा शिवारात विद्युत ट्रान्सफार्मरवर शार्ट सर्किटमुळे चिनोदा येथील शेतकरी दिलीप लक्ष्मण मराठे यांचे रोझवा शिवारात गट नं. ४६/१ हे ऊसाचे क्षेत्र आहे. या क्षेत्रात एकूण चार ऐकर ऊसाची लागवड केली होती. तर प्रदिप लक्ष्मण मराठे गट नं.४६/२ या क्षेत्रात दोन ऐकर ऊसाची लागवड केली होती. तसेच रांझणी येथील शेतकरी भूषण मल्हारी कापसे गट नं ४४/१ या क्षेत्रात दोन ऐकर ऊसाची लागवड तर लताबाई मल्हारी मराठे गट नं.४४/२ या क्षेत्रात चार ऐकर ऊसाची लागवड केली होती. दि.४ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास विद्युत ट्रान्सफार्मरवर शॉर्टसर्किट होऊन ऊसाने पेट घेतला. क्षणार्धात आगीने रौद्ररुप धारण केले. यात चिनोदा येथील दोन शेतकऱ्यांचे सहा ऐकर तर रांझणी येथील दोन शेतकऱ्यांचे सहा असे एकूण १२ ऐकर क्षेत्रावरील ऊस शार्ट सर्किटमुळे जळून खाक झाला. यात साधारण दहा ते बारा लाखाचे नुकसान झाले आहे. सदर घटनेची माहिती कळताच सदर शेतकरी शेतात पोहचतो तोपर्यंत ऊस जळून खाक झाला होता. तरी तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी यांच्याकडून करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

एकात्मीक आदिवासी विकास समितीच्या नंदुरबार प्रकल्प अध्यक्षपदी दिलीप नाईक यांची तर तळोदा प्रकल्प समितीच्या अध्यक्षपदी गीता पाडवी यांची नियुक्ती

Next Post

जिल्हा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी कोरोना शहीद पोलीस अमंलदारांच्या घरी साजरी केली दिवाळी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add