Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महाविद्यालय, टपाल, बँकेसह शासकीय कार्यालयांत नागरिकांना प्रवेशाआधी करावे लागेल लसीकरण: जिल्हाधिकारी मनीषा खत्री

team by team
November 4, 2021
in आरोग्य
0
नागरिकांनी दीपोत्सवात मास्क वापरत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार l प्रतिनिधी
कोविड संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव टाळण्याबरोबरच कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला गती देण्यासाठी 18 वर्षांवरील महाविद्यालयीन विद्यार्थी, जिल्ह्यातील सर्व बँक, टपाल कार्यालय आणि शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयामध्ये प्रवेशापूर्वी लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन तथा जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहेत.

18 वर्षांवरील विद्यार्थी ज्यांनी कोविड -19 च्या लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. तेच विद्यार्थी विद्यापीठ व महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहू शकतील. जे विद्यार्थी, विद्यार्थींनींनी प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहता येणार नाही. त्यांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन द्यावी. ज्या विद्यार्थ्यांनी कोविड-19 ची लस घेतलेली नाही. त्यांच्या करिता विद्यापीठाचे संबंधित संस्थाचे प्रमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्याकडून स्थानिक प्राधिकरणांशी समन्वय साधून लसीकरणासाठी विशेष मोहिम राबवून लसीकरण पुर्ण करुन घ्यावे.

बँक व पोस्टाच्या ठिकाणी जे नागरिक भेट देणार आहेत.त्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांना लसीकरण केल्यानंतर प्रवेश देण्यात येईल. बँक व्यवस्थापक तसेच पोस्ट प्रमुख बँक व टपाल कार्यालयाच्या जवळच्या लसीकरण केंद्रात जावून नागरीकांना लसीकरणाबाबत निर्देश द्यावेत.

शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय,चित्रपटगृहे, नाट्यगृहे, आणि बंदिस्त सभागृह, फटाके विक्री स्टॉलच्या ठिकाणी प्रवेशासाठी लसीकरण करणे आवश्यक असेल.ज्या नागरिकांनी लसीकरण केले नसेल त्यांना प्रवेश देण्यात येवू नये. त्यासाठी त्यांना लसीकरणासाठी निर्देश देण्यात यावेत.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीकडून पथकांद्वारे बँक व टपाल,महाविद्यालय, परिसंस्था, विद्यापीठ , शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय,चित्रपटगृहे, नाट्यगृहे, आणि बंदिस्त सभागृह येथे अचानक तपासणी करण्यात येईल. व आदेशाचे उल्लंघन आढळल्यास जबाबदार धरण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नागरिकांनी दीपोत्सवात मास्क वापरत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Next Post

विशेष लसीकरण शिबीरास जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद, दोन दिवसात 65 हजार 306 लसवंत

Next Post
विशेष लसीकरण शिबीरास जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद, दोन दिवसात 65 हजार 306 लसवंत

विशेष लसीकरण शिबीरास जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद, दोन दिवसात 65 हजार 306 लसवंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add