Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रांतपाल ला.दिलीप मोदी यांची लायन्स परिवाराच्या सेवा प्रकल्पास भेट

team by team
November 4, 2021
in सामाजिक
0
प्रांतपाल ला.दिलीप मोदी यांची लायन्स परिवाराच्या सेवा प्रकल्पास भेट

नंदुरबार l प्रतिनिधी

येथील लायन्स क्लबला प्रांतपाल दिलीप मोदी यांनी भेट देऊन विविध उपक्रमाची पाहणी केली.यावर्षी लायन्स डिस्ट्रिक्ट ३२३४ चे प्रांतपाल दिलीप मोदी यांनी त्यांच्या भेटीची सुरवात  नंदुरबार लायन्स परिवारास भेट देऊन केली. या प्रसंगी त्यांचे सोबत एम.जे.एफ.ला. जळगाव झोन चेअरमन गिरीश सिसोदिया,ला.जीनेंद्र जैन,लायन्‍स अध्‍यक्ष शेखर कोतवाल,लायन्‍स फेमिनाच्‍या अध्‍यक्षा हीना रघुवंशी उपस्थित होते.

या दौऱ्याचे आयोजन लायन्स क्लब व लायन्स क्लब फेमिना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला होता.ला.मोदी यांनी सर्व प्रथम लायन्स परिवाचे स्थायी प्रकल्प लायन हॉल, लायन चौक, लायन पाणपोई, लायन चिल्ड्रन पार्क, अन्नपूर्णा प्रकल्प, माणुसकीची भिंत इ सेवा प्रकल्पास भेटी देवून समाधान व्‍यक्‍त केले.सिव्हिल हॉस्पिटल जवळ लायन्स क्लब तर्फे व सिंधी कॉलनी जवळ लायन्स फेमिना तर्फे स्वागत फलकाचे व स्थायी मधुमेह तपासणी शिबीराचे उद्घाटन प्रांतपाल यांच्या हस्ते करण्यात आले.या नंतर लायन्स प्रथेनुसार प्रांतपाल यांनी दोन्ही क्लबच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ची बैठक घेतली व नंतर सर्व सदस्‍यांसोबत बैठकचे आयोजन करण्यात आले. यात लायन्स क्लब सचिव राहुल पाटील,लायन्स फेमिना सचिव सीमा मोडक यांनी वर्षभरातील सेवा कार्य अहवाल वाचन केले.या कार्यक्रमात प्रांतपाल मोदी यांनी लायन्स क्लबचे अध्यक्ष शेखर कोतवाल व लायन्स फेमिना अध्यक्षा हिना रघुवंशी यांचा स्‍मृतीचिन्‍ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच लायन्स क्लब इंटरनॅशनल कडून व डिस्ट्रिक्ट कडून काही सदस्यांचा स्‍मृतीचिन्‍ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.लायन्स परिवारातील विविध सेवा प्रकल्पांचे प्रकल्‍प चेअरमन व माजी अध्यक्षांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.पीस पोस्टर विजेत्या विदयार्थ्यांना पालकांसह गौरवण्यात आले.प्रांतपाल मोदी यांनी लायन्स परिवार करत असलेल्या सेवा कार्याचे कौतुक केले.व आगामी सेवा कार्याची दिशा दिली.सुत्रसंचालन विष्‍णू जोंधळे तर आभार सीमा मोडक यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन दोन्ही क्लब चे पदाधिकारी व सदस्यांनी केले.

 

बातमी शेअर करा
Previous Post

राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ठ दर्जाचे, आदिवासी विद्यार्थी संघटनेतर्फे तहसीलदारांना निवेदन

Next Post

शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी अर्ज सादर करावेत

Next Post

शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी अर्ज सादर करावेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add