Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेत मतदारांनी नाव नोंदवावे, जिल्हाधिकारी मनीषा खत्री याचे आवाहन

team by team
October 29, 2021
in राज्य
0
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेत मतदारांनी नाव नोंदवावे, जिल्हाधिकारी मनीषा खत्री याचे आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी
मुख्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. मतदार याद्या पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये पात्र नागरिकांनी सहभागी होवून नाव नोंदवावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.

या कार्यक्रमातर्गंत सोमवार 1 नोव्हेंबर 2021 रोजी एकत्रीकृत प्रारुप मतदार याद्या प्रसिध्दी करण्यात येतील. दावे व हरकती 1 नोव्हेंबर 2021 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत स्वीकारण्यात येतील. शनिवार 13 नोव्हेंबर, रविवार 14 नोव्हेंबर, शनिवार 27 नोव्हेंबर तसेच रविवार 28 नोव्हेंबर 2021 रोजी विशेष मोहिम राबविण्यात येईल. दावे व हरकती 20 डिसेंबर 2021 पर्यंत निकाली काढून 5 जानेवारी 2022 रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करण्यात येईल.

पात्र नागरिकांनी मतदार नोंदणीसाठी फॉर्म नमुना क्रमांक 6, मृत मतदार, कायमस्वरुपी स्थलांतरीत मतदारांचे मतदार यादीतील नाव नमुना क्रमांक 7, मतदार यादीतील नावांची किंवा तपशीलाची दुरुस्ती करण्यासाठी नमुना क्रमांक 8, मतदारसंघामध्ये स्थलांतर झाले असल्यास नाव नोंदणीकरिता नमुना क्रमांक 8 अ चा वापर करावा.

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या कालावधीत 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या अधिकाधिक पात्र नागरिकांनी मतदार म्हणून आपली नावे नोंदवावीत. त्याचबरोबर मृत, दुबार, समान नोंदीदेखील वगळता येतील. तसेच आवश्यक असल्यास पत्त्यात अथवा नावात दुरुस्त्याही करता येतील. यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज भरुन संबंधित तहसीलदार कार्यालय, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना नियुक्त केलेल्या ठिकाणी सादर करावेत. कार्यक्रमाबाबत गावाच्या चावडीवर मतदार यादीचे वाचन होणार असून ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. राजकीय पक्षांनाही मतदान केंद्रासाठी अभिकर्त्यांची (बीएलओ) नियुक्ती करता येणार असून या बीएलओ कडून दिवसाला 10 मतदार नोंदणीचे अर्ज स्विकारले जाणार आहे. मतदार याद्या पुनरीक्षण कार्यक्रमाचा नागरिकांनी अधिकाधिक लाभ घ्यावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व विविध शासकीय उपक्रमांच्या प्रसिद्धीचे व्यापक नियोजन करावे : माहिती जनसंपर्क सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे

Next Post

मताधिकार जागृतीसाठी ‘लोकशाही दीपावली स्पर्धा, आपल्या घरी जनजागृती करणारा आकाश कंदील बनवा, रांगोळी काढा व बक्षीस मिळवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add