नंदुरबार l प्रतिनिधी
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये माजी सैनिक प्रवर्गातून महाराष्ट्र राज्यत सात हजार 425 सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात येणार आहे. त्यासाठी सैन्य दलातून निवृत्त झालेल्या व पात्रता पूर्ण करणाऱ्या धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील माजी सैनिकांनी 2 नोव्हेंबर 2021 पर्यंत डिस्चार्ज बुक, ओळखपत्र, एम्प्लॉयमेंट कार्डसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धुळे येथे प्रत्यक्ष भेट देवून नाव नोंदवावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.
शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशीही नोंदणी प्रक्रिया सुरू राहणार आहे. सुरक्षारक्षक पदासाठी पात्रता अशी (अनुक्रमे वय, शिक्षण, सैन्य दलातील सेवा, सैन्य दलातील चारित्र्य, मेडिकल कॅट या क्रमाने) : एक ऑक्टोबर 2021 रोजी 45 वर्षांपेक्षा कमी असावे, किमान आठवी उत्तीर्ण परंतु बारावी उत्तीर्ण नसावा, किमान 15 वर्षे, हवालदार, चांगले, आयशेप- 1.








