Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सेवानिवृत्त पोलिसांच्या अडचणी सोडविण्याचे नुतन पोलीस अधिक्षकांचे आश्वासन

team by team
October 26, 2021
in सामाजिक
0
सेवानिवृत्त पोलिसांच्या अडचणी सोडविण्याचे नुतन पोलीस अधिक्षकांचे आश्वासन

नंदुरबार l प्रतिनिधी

सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या विविध मागण्या प्रलंबित असल्याने सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार कल्याणकारी सेवाभावी संघटनेच्या पदाधिकारी शिष्टमंडळाने नुतन पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांची सदिच्छा भेट घेवुन चर्चा केली. सदरच्या अडचणी व मागण्या त्वरीत सोडविण्याबाबत पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी शिष्टमंडळास आश्वासन दिले.

नंदुरबार जिल्हा सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार कल्याणकारी सेवाभावी संघटनेकडुन सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निवृत्ती योजनेचा लाभ मिळावा आणि अडचणी सोडविण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. गेल्या दोन वर्षांपासुन मागण्यांसाठी पाठपुरावा होत असुन त्या प्रलंबित राहत आहे. म्हणुन नंदुरबार जिल्हा सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कल्याणकारी संघटनेच्या पदाधिकारी शिष्टमंडळाने नंदुरबारचे नुतन पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांची भेट घेतली. यावेळी पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील व पोलीस उपअधिक्षक विश्वास वळवी यांचा संघटनेकडुन सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, अंमलदार यांच्या विविध अडचणी आणि मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली. सेवानिवृत्त वेतन, ग्रज्युईटी, पेन्शन विक्री, रजा रोखीकरण आदी योजनांच्या लाभापासुन नंदुरबार जिल्ह्यातील सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी वंचित असल्याची माहिती संंघटनेने दिली. त्यावर पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी चर्चा करुन सेवानिवृत्तांच्या मागण्या व अडचणी त्वरीत सोडविण्यात येतील, असे आश्वासन दिले. याप्रसंगी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार कल्याणकारी सेवाभावी संघटनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष मोतीलाल ठाकुर, उपाध्यक्ष रमेश खवळे, सचिव जगन्नाथ जगदाळे, संचालक रऊफ शाह, प्रदिप पाटील, साहेबराव सैंदाणे, सदस्य प्रकाश राणे, सदाशिव शिरसाळे, केसरसिंग क्षत्रिय, काशिनाथ जाधव, संभाजी सोनवणे, सरीचंद पवार, प्रभाकर बागल, विनोदसिंग राजपुत आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

आयान साखर कारखान्याच्या गाळप हंगामास प्रारंभ बारा लाख टन गाळपाचे उद्दिष्ट, वीज निर्मिती प्रकल्प सुरू

Next Post

विरोधी नगरसेवकांना अपात्र ठरवण्याचा पालिकेचा ठराव रद्द करण्याची भाजपा नगरसेवकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Next Post

विरोधी नगरसेवकांना अपात्र ठरवण्याचा पालिकेचा ठराव रद्द करण्याची भाजपा नगरसेवकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

August 20, 2026
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

August 20, 2026
भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख पदी हिंदू सेवक केतन रघुवंशी यांची निवड

भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख पदी हिंदू सेवक केतन रघुवंशी यांची निवड

August 20, 2026
महा-साधना सप्ताहात नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालयाचा दबदबा

महा-साधना सप्ताहात नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालयाचा दबदबा

August 20, 2026
तळोदा बायपास रस्त्यावरील मंजूर महामार्गालगत सर्विस रोड सुरू करावा:  आ.चंद्रकांत रघुवंशी

तळोदा बायपास रस्त्यावरील मंजूर महामार्गालगत सर्विस रोड सुरू करावा: आ.चंद्रकांत रघुवंशी

August 16, 2026
भालेर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

भालेर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

August 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add