नंदुरबार l प्रतिनिधी-
नांदरखे, ता. नंदुरबार येथील प्रगती विद्या प्रसारक संस्था नंदुरबार संचलित, वि.जा.भ.ज. प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत संस्थेच्या प्रेरणास्थान स्व. विद्याताई लक्ष्मण पाटील यांच्या जन्मदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात स्व. विद्याताई लक्ष्मण पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन चेअरमन विशाल पाटील व मुख्याध्यापिका प्राप्ती पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
सौ.पाटील यांनी सांगितले की स्व.विद्याताई पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेले योगदान, समाजातील वंचित व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी केलेले कार्य आणि शैक्षणिक विकासासाठी घेतलेले परिश्रम यांचे यावेळी स्मरण करण्यात आले. त्यांनी लावलेल्या शिक्षणरूपी रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले असून, त्यांच्या कार्यातून अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी आणि उज्ज्वल भविष्याची दिशा मिळाली आहे.
संस्थेचे चेअरमन श्री.पाटील यांनी सांगितले की ताईंचे विचार, त्यांचे सामाजिक कार्य आणि शिक्षणाप्रती असलेली तळमळ ही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून आपले जीवन घडवावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल खैरनार यांनी केले व आभार प्रदर्शन आर. बी. पाटील यांनी केले कार्यक्रमाचे साठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले








