नंदुरबार l प्रतिनिधी-
नांदरखे ता. नंदुरबार येथील प्र.वि. प्र. संस्था नंदुरबार संचलित, वि.जा.भ.ज प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा येथे रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका प्राप्ती पाटील व प्राथमिक मुख्याध्यापक सागर नामगे यांच्या हस्ते सरस्वती मातेचे प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात झाली. यावेळी सर्व शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तु पासून सुंदर अशा राख्या तयार केल्या, व रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका प्राप्ती पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.रक्षाबंधन हा बहीण आणि भावाच्या पवित्र व अतूट प्रेमाचा, विश्वासाचा आणि संरक्षणाचा एक प्रमुख सण आहे.
राखी बांधणे: या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर संरक्षणाचे प्रतीक म्हणून रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधते. यादरम्यान भाऊ आपल्या बहिणीला सुरक्षेचे वचन देतो व तिला प्रेमाने भेटवस्तू देतो. श्री नामगे यांनी रक्षाबंधन या सणाचा ऐतिहासिक महत्त्व सांगितले इंद्र आणि शची: वृत्रासुराशी युद्धाला जाताना इंद्राच्या विजयासाठी शचीने इंद्राच्या हातावर विष्णूंचे रक्षासूत्र बांधले होते, अशी बहिणीचे रक्षण करणे हे भावाचे कर्तव्य असते, हा विचार या सणातून समाजात रुजवला जातो.
हा सण केवळ रक्ताच्या नात्यापुरता मर्यादित नसून, कोणत्याही स्त्रीचा आदर व संरक्षण करण्याचा संदेश देतो. प्रशांत शिंदे यांनी रक्षाबंधन हा सण आपल्या संस्कृतीची सुंदर परंपरा आहे. हा सण भाऊ-बहिणीमधील प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकीची भावना अधिक दृढ करतो. आधुनिक काळातही या सणाचे महत्त्व तितकेच आनंदाचे व पवित्र मानले जाते. कार्यक्रम यशस्वी साठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले








